उपजिल्हा रुग्णलयातील नियोजन शून्यतेमुळे रुग्णांची हेळसांड, तीन ते चार दिवसानंतर मिळतोय रक्ततपासणी रिपोर्ट, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत टेमुर्डे यांच्या नेतृत्वात पाहणी


वरोरा:—
जिल्हा उप रुग्णालय वरोरा, मध्ये अनेक प्रकारच्या सुविधा असल्याने येथील येणाऱ्या रुग्णांना गरोदर मातांना वृद्धांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे एवढेच नव्हे तर येथील व्यवस्थाही ढिसाळ असल्याने वरोरा भद्रावती विधानसभा नेते जयंत टेमुर्डे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांसह उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्यात आली.
उपजिल्हा रुग्णालयात नियोजन व कमतरते विषयी डॉ.खुजे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे निवेदन देण्यात आले.
वरोरा तालुक्यातील सध्या शहर व ग्रामीण भागात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आहे त्या आजाराने ग्रासलेले अनेक रुग्ण उप जिल्हा रुग्णालयात येत असतात रुग्णांची संख्या बघता बघता वाढत चाललेली आहे, एवढेच नव्हे तर अनेक रुग्णांना येथे समाधान होत नसल्याचेही दिसून येत आहे लहान सहान गोष्टीसाठी रुग्णांना चंद्रपूर रेफर केल्या जात असल्याचेही दिसून येत आहे, अनेक रुग्णांना देण्यात येणारी औषधी यामध्ये खोकल्याचे औषधासाठी स्वतः बाटली घेऊन येण्यास भाग पाडले जात असून, त्या औषधीचे दोन ते तीन भाग केले जात आहे, रुग्णालयात यावरून औषधी गोळ्यांचा साठा याचा याची कमतरता दिसून येत आहे, येथे रुग्ण रुग्ण रक्त तपासणीसाठी तपासणीसाठी येत असतात त्यामध्ये डेंगू मलेरिया अन्य साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास येथे तपासण्यात आलेल्या रक्ताचा रिपोर्ट हा दोन ते चार दिवसानंतर मिळत असल्याने तोपर्यंत रुग्णाच्या आजारात वाढ झाल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता ही नाकारता येत नाही अशी बिकट परिस्थिती या उपजिल्हा रुग्णालयात दिसून येत आहे, असे अनेक मुद्दे अनेक समस्या घेऊन या समस्या बाबत अवगत करण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरोरा भद्रावती विधानसभा नेते जयंत मोरेश्वर टेमुर्डे यांच्या नेतृत्वात डॉ. खुजे साहेब यांच्याशी नियोजन ,आरोग्य साहित्य , औषधी , परिसर स्वच्छता या विषयावर चर्चा करून ग्रामीण व शहरी जनतेला आपल्या विभागामार्फत सेवा देण्याची विनंती करण्यात आली तचेच वरोरा येते ट्रॉमा केअर दवाखाना सुरू आहे पण त्या ठिकाणी डॉक्टरची कमतरता असल्याने पाहिजे ती सुविधा आपण जनतेला देऊ शकत नाही या साठी स्टॉप चे नियोजन करावे असे सांगण्यात आले या वेळी श्री अविनाश ढेगळे, अरुण साहरे, राजू वरघाने,विजय धदरे,प्रवीण वासेकर,सुनीता राऊत,लताताई हिवरकर, सुशीला तेलमोरे,मोनाली काकडे, शिल्पा रूयारकर,मारोती किंनाके, नागाजी निंभरकर,मुकेश वाटकर व असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी हजर होते