
सहसंपादक:- रामभाऊ भोयर
वेकोलीच्या एकोना खाणीतून दररोज हजारो टन कोळश्याची खैरी वडकी मार्गे वाहतूक केली जाते. ही वाहतूक करताना कोळश्यावर ताडपत्री बांधली जात नाही. त्यामुळे प्रचंड धूळ उडत असून रस्त्यावरून चालणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहन चालकाचा जीव धोक्यात आला आहे. ओव्हरलोड व ताडपत्री न झाकता कोळश्याची वाहतूक करणाऱ्या ट्रक मालकावर कारवाई का केली जात नाही. आरटीओच्या हप्त्यामध्ये या भागात दोन ते तीन चकरा होतात परंतु या बाबीकडे आर. टी. ओ. चे दुर्लक्ष का.?
कोळसा वाहतूक करण्याबरोबरच ट्रकवर ताडपत्री बांधणे बंधनकारक आहे. मात्र खैरी वडकी परिसरातून होणाऱ्या वाहतुकीचे ट्रकमालक व चालकाकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे कोळसा वाहतुकी दरम्यान रस्त्यावर खाली पडतो. त्या दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी व दुचाकी वाहन चालकाच्या अंगावर हा कोळसा पडून मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्या कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकवर ताडपत्री बांधली नसेल अशा ट्रकमालक व चालकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरीकांकडून होत आहे. आरोग्याच्या अनेक समस्या कोळशाची धूळ उडत असल्याने ती श्वसनाद्वारे शरीरामध्ये जाते. त्यामुळे नागरिकांना दमा, आतड्याचे विकार, श्वसनाचे विकार असे अनेक आजार जळत आहे.
त्यामुळे नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड बसत आहे. यासोबतच कोळसा वाहतूक होत असलेल्या ट्रकच्या मागे असणाऱ्या दुचाकी वाहनाचा धुळीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने विना ताडपत्रीद्वारे जाणाऱ्या ट्रकवर कारवाई करावी. अशी मागणी खैरी परिसरातील नागरिकांना नागरीकांकडून होत आहे.
