
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक ११/०८/२०२५
सोनामाता हायस्कूल चहांद येथे भारत सरकारच्या आदेशानुसार घर तिरंगा अभियान अंतर्गत जनजागृती करण्यासाठी गावामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान भारतातील प्रत्येक नागरिकांनी आप आपल्या घरावर तसेच शासकीय कार्यालयावर तिरंगा फडकवावा यासाठी रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक माननीय अनिल धोबे सर व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत रॅलीचा शुभारंभ शाळेच्या पटांगणातून करण्यात आला. शाळेतील लेझीम पथक, सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी रॅलीत उत्साहाने सहभागी झाले होते. गावातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत रॅली परत शाळेत आणण्यात आली. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे व ध्वजारोहणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी रॅली यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
