राहुलजी गांधी यांच्या बाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड आणि आमदार अनिल बोंडे यांच्यावर कार्यवाहीची मागणी, यवतमाळ येथील पोलिस ठाण्यात दिले निवेदन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व तथा युवकांचे प्रेरणास्थान देशाचे नेते लोकसभेचे विरोधीपक्ष नेते मा. आदरणीय खासदार राहूलजी गांधी यांच्या बाबत बेताल वक्तव्य करणारे शिंदे सेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि आमदार अनिल बोंडे यांच्यावर यवतमाळ जिल्हा कांग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभाग यवतमाळ यांच्या वतीने दिनांक १९/९/२०२४ रोजी अट्रक्टसिटी अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलिस ठाणे यवतमाळ येथे तक्रार दाखल करण्यात आली. आणि देशाच्या एका नेत्याबाबत अशा प्रकारे बेताल वक्तव्य करणाऱ्या गायकवाड आणि बोंडे यांच्यावर कडाडून टीका करून तक्रार दाखल केली.त्यावेळी यवतमाळ कांग्रेस अनुसूचित जाती विभाग यवतमाळ जिल्हा अध्यक्ष महेंद्रजी कावळे सर यांच्या नेतृत्वाखाली मिलिंदभाऊ रामटेके सरचिटणीस महाराष्ट्र कांग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्र प्रिंयकाताई बिडकर प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्र प्रबोधिनी रामटेके, मिलिंद धुळे, सिद्धार्थ भवरे, अशोक दवणे, संजय वाळके, विलास भवरे, मोहन लोखंडे,कौलस करके,धर्मादास वाणी, मुकेश देशभ्रतार, आदित्य मानकर, राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुश मुनेश्वर, धनपाल पुडके, कैलास गोंडाने,वर्षा म्हैसकर, कल्पना मुनेश्वर, पंडित कांबळे जिल्हाध्यक्ष कांग्रेस सोशल मीडिया अनुसूचित जाती विभाग यांच्या सह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.