
सहसंपादक : रामभाऊ भोयर
28 सप्टेंबर रोजी देशासाठी प्राणाची आहुती देणारे भारत मातेचे वीर सुपुत्र शहीद भगत सिंग यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला घालून वीर भगत सिंग संघटन राळेगाव तर्फे मोठ्या जल्लोषात त्यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला राळेगाव शहरातील सर्व देशप्रेमी तसेच प्रमुख अतिथी म्हणून लोक जनशक्ती पार्टी (राम विलास पासवान) प्रदेशाध्यक्ष श्री हर्षद दादा छोरीया, माजी सैनिक संजयभाऊ एकोणकार व शंकरभाऊ सायसे, मेघश्याम चांदेजी उपस्थित होते यावेळी भगतसिंग यांचे कार्य व देशासाठी दिलेले बलिदान यावर सर्वानी मनोगत व्यक्त करून अभिवादन करण्यात आले असून संघटनेचे मार्गदर्शक विनय भाऊ मुनोत,अफसर भाऊ अली, संघटनेचे उपाध्यक्ष सागर भाऊ एम्बडवार , सुरज भाऊ राजूरकर , दिनेश भाऊ करपते, प्राधुन्य भाऊ इंगोले, सागर भाऊ वर्मा ,एडवोकेट दीक्षांत भाऊ खैरे ,रोहित दादा पिंपरे, अजय भाऊ चांदेकर ,स्वप्नील भाऊ हजारे ,मंगेश भाऊ पिंपरे , जगदीश भाऊ निकोडे ,ऋषिकेश भाऊ पिंपरे ,सौरभ भाऊ नारनवरे, शैलेश भाऊ ठाकरे, लखन भाऊ कनोजिया, हर्ष हांडे , प्रवीण भाऊ लाखसवार व इतर मान्यवर वीर भगतसिंग चौक राळेगाव येथे कार्यक्रम स्थळी उपस्तित होते.
