
महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून कार्यकर्ता उपस्थित राहणार
सहसंपादक -रामभाऊ भोयर
औरंगाबाद, ओसा, नांदेड, या तिन सभा भारत राष्ट्र समितीने गाजविल्यानंतर भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीने पुढील राजकीय वाटचालीकरता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत २ मे ला हैदराबाद येथे झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत महाराष्ट्रातील 288 विधानसभा लढविण्याचे ठरविले होते .त्यानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात प्रचार यात्रा फिरण्यासाठी कार्यकर्त्याचे प्रशिक्षण, कार्यशाळा 19 व 20 मे ला अनंता लान्स पूर्णा रोड नांदेड येथे आयोजित करण्यात आलेले आहे .तेलंगणा राज्यातील मॉडेल प्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात त्या सोयी सुविधांची माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभेतील शेतकऱ्यांपर्यंत प्रचार प्रचार दौऱ्या दरम्यान शेतकऱ्यांना व सामान्य जनतेला व्हावी त्याकरता नियोजन केल्या जात आहे. तेलंगणामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला एका एकरमागे १० हजार रुपये दरवर्षी अनुदान दिले जाते जातात शेतीमाल खरेदीसाठी 7000 खरेदी केंद्र सुरू केली व 24 तासात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्या जातात, नैसर्गिक अपघाती व आकस्मित मृत्यू
झाल्यास १० दिवसात पाच लाख रुपये ची मदत , कल्याण लक्ष्मी व शादी मुबारक योजने अंतर्गत एक लाख 116 रुपये मुलीच्या लग्नासाठी तात्काळ मदत ,ज्येष्ठ नागरिकांना व एकट्या स्त्रियांना महिन्याला 2 हजार २१६ रुपये मदत, दिव्यांग यांना महिन्याला ३ हजार २१६ रुपये मदत, धनगर समाजाला मेंढीपालनासाठी मोफत मेंढ्या दिल्या जातात, गरोदर व तनवा मातांसाठी ने आण करण्याकरिता सर्व आरोग्य सेवा मोफत ,बाळाच्या जन्मानंतर १२००० हजार व मुलीच्या जन्मानंतर 13000 दिले जातात ,दलित बंधू योजनेतून रोजगारासाठी दलितांना १० लाख रुपये दिले जातात ,शेतकऱ्यांच्या शेतावर घरबांधणी करता आर्थिक मदत केल्या जाते, मुला मुलींच्या लग्नासाठी सहायता निधी दिले जाते ,शेतकऱ्यांना 24 तास अखंडित विजेचा मोफत पुरवठा केला जातो, शेतीसाठी व पिण्याचे पाणी मोफत दिले जाते ,त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम तेलंगणा सरकार करीत आहे. त्या योजनेची पूर्तता महाराष्ट्र सुद्धा व्हावे याकरिता शेतकरी किसान यात्रा महाराष्ट्रातील प्रत्येक 288 विधानसभा क्षेत्रात काढण्यात येणार आहे. या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव स्वतः उपस्थित राहणार आहेत व पक्षाच्या प्रचारात करिता महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक महिना गाडी फिरणार आहे. त्यामध्ये पक्षाचे पत्रके व बॅनर वाटप करण्यात येणार आहेत. अबकी बार किसान सरकार या टॅगलाईनच्या जोरदार प्रचार करण्यात येणार आहे .तेलंगणाचे मॉडेल घरोघरी पोहोचविण्याकरता प्रत्येक गावात दोन समित्या तयार करण्यात येणार आहेत .समितीच्या प्रमुखास टॅब देण्यात येणार आहे .महाराष्ट्रात जवळपास 30 लाख सदस्य तयार करण्याचे पक्षाचे उद्दिष्ट आहे .या प्रशिक्षण शिबिरात असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रातील उपस्थित राहणार आहेत.
