
बिटरगांव ( बु )प्रतिनिधी// शेख रमजान
काल सायंकाळी ढाणकी फुलसावंगी रोडवरील टेंभेश्वर नगर येथे मोटर सायकलच्या झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले. राजू सदाशिव धुमाळ वय ४० वर्ष राहणार निंगणुर व नरेश भीमराव चव्हाण वय 35 वर्ष राहणार मेट अपघातात गतप्राण झालेल्या युवकांची नावे आहेत तर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ढाणकी येथील सौम्य वाईन बार येथे दोघे कामाला होते. दिनांक 17 जानेवारी रोजी रोजची कामे आटोपुन घराकडे निघाले असता अचानक समोर कुत्रा आल्याने त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडीचा अपघात झाला. दोघेही घरातील कर्ते पुरुष असल्याने त्यांच्या कुटुंबावर आभाळच कोसळले आहे. पुढील तपास बिटरगाव पोलीस स्टेशन करत आहे.
