खैरी जि. प. केंद्र शाळेत जनजागृती अभियान व ग्रामस्वच्छता विषयावर प्रबोधन: जनजागृती शिक्षण प्रसार मंडळाचा उपक्रम

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील खैरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, खैरी येथे १३ जानेवारी२०२४ रोजी जनजागृती शिक्षण प्रसार मंडळ या संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम भाऊरावजी साळवे रा. खरवड ता. वरोरा जि. चंद्रपूर, संस्था रजिस्ट्रेशन नंबर ३८७/९५ यांनी ग्रामस्वच्छता व्यसनमुक्ती शेतकरी आत्महत्या इत्यादी विविध विषयावर शाळेतील विद्यार्थ्यांसमोर प्रबोधन केले.

राळेगाव तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक केंद्र शाळा, खैरी येथे हागणदारीमुक्त गाव, बेटी बचाव बेटी पढाव, शेतकरी आत्महत्या, भ्रुणहुन्या, व्यसनमुक्ती इत्यादी विषयावर मनोरंजनात्मक प्रबोधन तसेच तंबाखू, गुटख्याचे दुषपरिणाम याविषयी जनजागृती केलीः तसेच अधश्रध्दे सोबतच शिक्षणाचं महत्त्व वि‌द्याथ्यर्थ्यांना पटवून दिले. त्याच बरोबर ज्ञानप्रबोधनात्मक प्रश्न विचारून त्यांना बाक्षिस म्हणून पेन सुध्छा बक्षीस दिल्या. त्यांचा सदर कार्यक्रम विद्याथ्यर्थ्यांना शिक्षकांना, मुख्याध्यापकांना अतिशय आवडला. प्रबोधनकार पुरुषोत्तम साळवे हे जवळपास ७० वर्षाचे असून त्यांचे वय पाहुन याही वयात समाज प्रबोधनाचे महान कार्य त्यांनी हाती घेतले आहे.

जनजागृती शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम साळवे यांच्या या समाज प्रबोधनाच्या महान कार्यास शाळा व्यवस्थापन समिती ,शाळेचे शिक्षक ,मुख्याध्यापक यांनी शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या या कार्यास मानाचा मुजरा करून त्यांना दीर्घायुष्य लाभो व अशीच समाजाची सेवा त्यांच्या हाताने घडत राहो अशा मनस्वी सदिच्छा सुद्धा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा खैरी कडून त्यांना देण्यात आल्या तसेच त्यांच्या या कार्यक्रमास शाळेकडून प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल वानखेडे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख सुरेश कुंभलकर शाळेचे शिक्षक प्रवीण दिडपाये,राजकुमार शिंदे, राजेंद्र दुरबुडे महेंद्र कौरती व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.