
सहसंपादक : रामभाऊ भोयर
हजरत वली दादा बादशहा दर्गाह कमिटी राळेगाव च्या वतीने आज दिं.१ नोव्हेंबर २०२५ रोज शनिवारला शाही संदल व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
शहरात दरवर्षी शाही संदल व महाप्रसादाचे आयोजन केल्या जात असते त्याचप्रमाणे याही वर्षी शाही संदल व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून हजरत वली दादा बादशाह र.अ. दर्गाह येथे महाप्रसादाला ११ वाजता पासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता पासून बस स्टेशन चौक येथून शाही संदल ला सुरुवात होणार असून शहरातील सर्व धर्मीय नागरिकांनी या शाही संदल व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन सर्वधर्मीय हुजरत वली दादा बादशाह उर्स कमिटी राळेगावच्या वतीने करण्यात आले आहे.
