
सहसंपादक : रामभाऊ भोयर
न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथे 5 सप्टेंबर शिक्षक दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या निमित्त शिक्षकांची भूमिका पार पाडून आज शाळेत स्वयंम शासन उत्साहात राबविण्यात आले.
या स्वयंम शासनाच्या निमित्त शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कु गौरी चिव्हाणे, तर उपमुख्याध्यापक कु. जान्हवी ठाकरे व पर्यवेक्षक प्रतीक दारव्हेकर यांनी आपली भूमिका
पार पाडली. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षकाची भूमिका पार पाडणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेकडून भेट वस्तू सुद्धा देण्यात आल्या. तसेच शिक्षक दिन या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय कचरे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक सूचित बेहरे, शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजक विनोद चिरडे, संजय चिरडे,तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका हे यावेळी मंचकावर उपस्थित होते.
शिक्षक दिन या कार्यक्रमाचे प्रास्तविक विनोद चिरडे यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन कु.अनुष्का ओंकार, कु अनुजा ढूमणे यांनी तर आभार प्रदर्शन कु सुहानी लांभाडे, कु जान्हवी कोहपरे हिने केले.
