जि. प केंद्र शाळा खैरी येथे शैक्षणिक सत्र २०२३-२४ दुसरी शिक्षण परिषद

    राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर 

शैक्षणिक सत्र २०२३ – २४ मधील खैरी केंद्रातील दुसरी शिक्षण परिषद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा खैरी पंचायत समिती राळेगाव येथे दिनांक २५- ०८ -२०२३ रोज शुक्रवारला वेळ १२ ते ४ या वेळेत पार पडली . ही शिक्षण परिषद खैरी केंद्र शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली सुरेश कुंभलकर केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक केंद्र शाळा खैरी , देऊळकर सर उच्च श्रेणी मुख्याध्यापक दहेगाव शाळा,प्रशांत महल्ले साधन व्यक्ती, नितीन पाटील स. शि. आष्टोना, मंगेश कोवळे सहायक शिक्षक मंगी संदीप आडे प्रभारी मुख्याध्यापक मुलींची शाळा खैरी यांचे मार्गदर्शनात पार पडली.या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खैरी केंद्राचे केंद्र प्रमुख तसेच खैरी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेश कुंभलकर सर यांनी केले. तसेच पहिली शिक्षण परिषद माहे जुलै चा मागोवा साधन व्यक्ती श्री प्रशांत महल्ले यांनी सादर केला. प्रमुख मार्गदर्शक तज्ञ शिक्षक नितीन पाटील सहाय्यक शिक्षक आष्टोना यांनी एक पाऊल गुणवत्तेकडे या विषयावर तर तज्ञ शिक्षक मंगेश कोवळे यांनीअध्ययन स्तर निश्चिती या विषयावर आणि तज्ञ शिक्षक संदीप आडे यांनी भाषा व गणित पेटी चा वापर या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सरोज शेंडे मॅडम व आभार प्रदर्शन श्री राजकुमार शिंदे यांनी केले. या शिक्षण परिषदेला खैरी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.
खैरी केंद्रात आयोजित दुसरी शिक्षण परिषद २०२३-२४ या कार्यक्रमाचे यशस्वी ते साठी खैरी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रवीण दीडपाये,राजेंद्र दुरबुडे, इरखडे सर, आडे मॅडम, स्वयंसेवीका योगिता धोटे यांनी विशेष परिश्रम घेतले.