
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील चिखली ( व ) गावात प्रवेश करतानाच ग्रामपंचायत समोर असलेल्या गावातून वळसा घालून जाणाऱ्या नालिवर असलेल्या रपट्यावर काही दिवसापासून मोठे भगदाड पडल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली असून याकडे ग्रामपंचायत चे सपसेल दुर्लक्ष दिसून येत असून रस्त्यावर पडलेले भगदाड दुरस्त करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
निवडणुकी पूर्वी मी असा करील मी तसा करील अशी मोठमोठी आश्वासन देणाऱ्यांनी गावात सुरुवातीला प्रवेश करताना ग्रामपंचायत समोर असलेल्या गावाला वळसा घालून येणाऱ्या नालीवर रपट्यावर मोठे भगदाड पडले असताना हे दिसत नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ग्रामपंचायत च्या निवडणुका होऊन तीन ते चार वर्ष झाले मात्र गावात विकासा ऐवजी गावातील अनेक समस्या कायमच दिसून येत आहे.
गावातील नालीवरी झाकणे तुटली आहे तसेच मागील दोन वर्षापूर्वी १४ वित्त आयोगातून लाखो रुपये खर्च करून गावातील नागरिकांना थंड पाणी मिळावे म्हणून आरो प्लांट उभे केले मात्र हे आरो प्लांट चार महिन्यातच विद्युत बिल न भरल्यामुळे बंद पडले आहे.सद्या उन्हाळ्याचे दिवस असून ग्रामपंचायत ने आरो प्लांट चे बिल भरले असते तर गावातील नागरिकांना थंड पाणी मिळाले असते परंतु दोन वर्षापासून आरो बंद असून सुद्धा ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे. तर ४० वर्षापासून असलेल्या स्मशानभूमी जाण्यासाठी रस्ता नसल्याने गावाच्या सभोवताल प्रेत जाळावे लागते अशा अनेक मोठमोठ्या समस्या अद्यापही कायम असून ग्रामपंचायत दुरुस्त करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे.तेव्हा या असलेल्या समस्येकडे ग्रामपंचायतीने वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.
