
सहसंपादक : रामभाऊ भोयर
जनवादी बांधकाम कामगार मजदूर संघटना यांच्या वतीने बांधकाम कामगार व इतर कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर कल्याणकारी मंडळ मध्ये नोंदणी करण्याकरिता मागील वर्षात ९० दिवस काम केल्याच्या प्रमाणपत्रावर नगरपंचायत कार्यालय राळेगावकडून सर्व शिक्का देण्याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक लघु उद्योग ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय व साधारण क्रमांक 245 13 ऑगस्ट 2014 रोजी चे शासन राजपत्र नुसार आदेश निर्गमित केले असून 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर सही देण्यास नकार देत असल्याने जनवादी बांधकाम कामगार मजदूर संघटना सचिव सम्येक म्हैसकर यांनी निवेदन सादर केले बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात अंतर्गत बांधकाम व इतर 21 प्रकारच्या कामगाराची नोंदणी व नूतनीकरण करून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत लाभार्थ्यांना 28 प्रकारच्या कल्याणकारी योजनेचा लाभ मंडळामार्फत राबविण्यात येत असल्याने आपल्या कार्यक्षेत्रातील बांधकाम कामगार व इतर कामगार नोंदणीपासून वंचित व नूतनीकरण होत नसल्यामुळे बांधकाम कामगार मंडळाच्या कल्याणकारी योजनेपासून वंचित राहत आहे कामगार हे एकापेक्षा अधिक घर मालकाकडे बांधकाम व इतर काम करतात वर्षभरात कामगार हा मिळेल जिथे तिथे काम करते प्रत्येक कामगार हा शासकीय कंत्राकदार यांच्याकडे काम करत नाही. त्यामुळे शासकीय कंत्राकदाराच्या 90 दिवस काम केल्याच्या प्रमाणपत्रावर सही शिक्का प्रत्येक कामगारांना मिळणे शक्य नाही. तरी आपल्या कार्यालयाकडून शहानिशा करून खऱ्या कामगारांना सही शिक्का देण्यात यावा असे निवेदन देण्यात आले यावेळी जनवादी बांधकाम कामगार मजदूर संघटनेचे सचिव माननीय संमेक म्हैसकर, प्रकाश बाबू करमळकर, शंकरजी चाफेकर, प्रशांत आळगानकार घनश्याम काळे संजय झाडे इत्यादी उपस्थित होते.
