
सहसंपादक : रामभाऊ भोयर
. राळेगाव तालुक्यातील चिखली, विहीरगाव गट ग्रामपंचायत सरपंच चरणदास साधूजी मेश्राम हे १८ मताने ग्रामसभेमधून पात्र झाले आहेत सविस्तर वृत्त असे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३५(१) नुसार दिनांक २४/९/२०२५ रोजी लोकनियुक्त सरपंच चरणदास साधूजी मेश्राम गट ग्रामपंचायत चिखली, विहीरगाव तालुका राळेगाव यांच्या विरुद्ध दाखल अविश्वास प्रस्ताव तहसीलदार राळेगाव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २४/९/२०२५ रोजी आयोजित ग्रामपंचायतीच्या विशेष सभा यामध्ये तीन चतुर्थांश इतक्या मतांनी संमत करण्यात आला होता. त्याअर्थी जिल्हा अधिकारी यवतमाळ यांनी उपोदद्यातातील वाचले संदर्भ क्र०१ अन्वये संमत झालेल्या अविश्वास प्रस्तावाची पडताळणी करणे करीता तहसीलदार राळेगाव यांनी प्राधिकृत केलेले आहे. त्या अनुषंगाने दिनांक १७/१०/२०२५ रोजी सकाळी ठीक ११ वा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विहीरगाव येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर या विशेष ग्रामसभे मधून सरपंच चरणदास साधूजी मेश्राम यांच्या बाजूने २३८ नागरिकांनी मतदान केले तर विरोधकांच्या बाजूने २२० नागरिकांनी मतदान केले असल्याने सरपंच चरणदास साधुजी मेश्राम यांच्या बाजूने १८ नागरिकांचे मतदान जास्त झाल्याने पुनश्च चरणदास साधुजी मेश्राम हेच सरपंच पदावर कायम राहत असल्याची घोषणा तहसीलदार अमित भोईटे यांनी केली आहे. सदर या विशेष ग्रामसभेला अधिकारी म्हणून काम पाहणारे ग्रामसभेचे पर्यवेक्षकीय अधिकारी म्हणून केशव पवार गटविकास अधिकारी राळेगाव तर प्राधिकृत अधिकारी म्हणून तहसीलदार अमित भोईटे राळेगाव, अरुण भगत नायब तहसीलदार, महादेव सानप मंडळ अधिकारी, चंद्रकांत पाटील पुरवठा निरीक्षक, विलास चांदेकर, नितीन जुम्नाके, धैर्यशील बोदडे, सहाय्यक अधिकारी लहूलेश वानखडे, दीपक मस्के विस्तार अधिकारी, प्रतीक बेसुरकर ग्राम विकास अधिकारी, वैभव कुडमते, देवेंद्र आत्राम, राहुल आत्राम, युवराज पंधरे, निलेश देवळे, एम एन लोहत, अनिकेत शिरभाते, प्रांजू खोडे, मनोज पन्नासे, निलोबा मातकर, रोशन पोळकट यांनी विशेष ग्रामसभेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे हे विशेष ग्रामसभा सुरक्षित होण्यासाठी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह मोलाची कामगिरी केली
