
सहसंपादक -रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथे गेल्या काही दिवसांपासून जनावरांवर लम्पी आजाराने आक्रमण केले असून त्यात काही छोटी मोठी काही जनावरं दगावली.जनावरावर रोगाचा वाढता प्रभाव पाहता वरूड जहांगीर येथील काही जागरूक नागरिकांनी या आजारांची वृत्तपत्रातून माहिती प्रसिद्ध करून शासनाला माहिती देण्याचा प्रयत्न केला असता वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध होताच पशुसंवर्धन विभाग राळेगाव येथील अधिकारी डॉ.रणजित नाठे यांनी आपली टीम घेऊन दिनांक 13/04/2023 रोजी वरूड गाव गाठून आजारग्रस्त जनावरांची पाहणी करून तपासणी केली व उपचार करून या आजारांमध्ये जनावरांची घ्यावयाची काळजी या बाबतीत मार्गदर्शन केले.त्यावेळी त्यांचे सोबत पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ सचिन मेश्राम, पशुसंवर्धन पर्यवेक्षक डॉ रचना वासनिक,परिचर कृष्णा भोरे,सेवादाता सौरभ भोरे,सेवादाता रूपेश मेश्राम, आकाश घेटेवार,दुर्गेश ढोले पशुसंवर्धन पर्यवेक्षक हे हजर होते.ही जनावरांची तपासणी ग्राम पंचायत कार्यालयाच्या परिसरात ग्राम पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य व शेतकऱ्यांच्या समक्ष करण्यात आली असल्याचे वृत्तपत्राद्धारे कळविले आहे.
