इंग्रजी व सीबीएससी शाळेचे वाढते अतिक्रमण पालकात संभ्रम मराठीची होत आहे गळचेपी. या निमित्याने होत आहे आर्थिक लूट

प्रती/प्रवीण जोशी

शहरी भागातील अतिरिक्त होऊ घातलेले इंग्रजी व सीबीएससी शाळेचे पीक आता सर्व दूर पसरताना दिसत आहे ग्रामीण भागात सुद्धा अशा शाळा आपले जाळे व पोत ओवत होत असून त्याला मॉडर्न तेचे म्हणजेच आधुनिकतेची साथ देऊन ज्ञानज्योत लावताना आपण बघतो आहे तसेच शहराच्या काही अंतरावर जेणेकरून सर्व खेडेगावातील विद्यार्थी सुद्धा शाळेत आले पाहिजे अशा बेताने अत्यंत माफक दरात जागा विकत घेऊन काही शिक्षण सम्राट म्हणण्यापेक्षा काही व्यवसाय सम्राट यांनी आपली दुकानदारी थाटली आहे आणि या ठिकाणी उभ्या होत असलेल्या मोठमोठ्या इमारती पालकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे तसेच उंच इमारत असलेल्या शाळेत केवळ उंच पुतळे उभारून मुख्याध्यापक व संस्थाचालक आपला कर्तव्य शून्य आणि निष्क्रियता झाकण्याचा केविलवाना प्रयत्न करताना काही ठिकाणी बघावयास मिळतो आहे.
तसेच भारताचे पंतप्रधान पंडित नेहरूंना नेहमीच बालका आवडायचे आणि त्याचे कारण सुद्धा तशाच पद्धतीचे होते. ते म्हणजे आदरणीय नेहरू नेहमी सांगायचे लहान मुलं हीच राष्ट्राची अमूल्य संपत्ती आहे म्हणून तत्कालीन काळात बाई आणि गुरुजी हे मुलांना बालगीत शिकवायचे ते असे की” छोटेसे बहिण भाऊ उद्याला मोठाले हो उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ” अशा प्रकारची बालगीते ऐकायला आता मिळत नाहीत उलट असे गीत म्हणणाऱ्यांना अज्ञ अडाणी आता समजल्या जाते. पण बालमनावर ज्या संस्काराची गरज असते ते त्या गाण्यामधून बिंबवल्या जाते पण हल्लीच्या आधुनिक भाषेत सांगावयाचे झाल्यास मॅडम व सर हे “जॉनी जॉनी यस पप्पा” अशी वाक्य रचना ऐकायला मिळत आहे वास्तवात यातून कोणत्या प्रकारचे संस्कार प्राप्त होत आहे हे कळायला मार्ग नाही. आणि भविष्यात मानव धर्म म्हणजे काय? याचा तसूभरही या इंग्रजी गाण्यात उल्लेख नाही हे विशेष बाब म्हणावी लागेल . तसेच आता या इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी शाळेची मोटार गाडी येते सबब एखाद्या वेळेस तांत्रिक अडचण आल्यास विद्यार्थ्यांचा अधिक भरणा नक्कीच करावा लागतो कारण तांत्रिक बिघाड कधी होईल सांगता येत नाही त्या अनुषंगाने अशावेळी मोटार गाडीत जास्त विद्यार्थी झाल्यास मोटार गाडी स्वतः उभे टाकून माझी चिमुकले विद्यार्थी बसतील अशा प्रकारची वृत्ती तत्कालीन काळातील गुरुजींची आणि बाईंची होती पण आजकाल मॅडम आणि सरांमधील ही सेवाभावी वृत्ती लुप्त होताना दिसत आहे चार शब्द इंग्रजी बोलले म्हणजे अहमब्रह्मस्वी ही वृत्ती दिसते. सांगावयाचे झाल्यास नाकापेक्षा मोती जड अशी अवस्था मॅडमची आणि.सरांची आढळते ज्या ठिकाणी नाकाला मोती जड होतो त्या ठिकाणी संपूर्ण नाकच गळून पडू शकते म्हणून एवढे सांगावेसे वाटते की मॅडमची व सरांची अवस्था नाकापेक्षा मोती जड अशी होऊ नये म्हणजे झाले.
अनेक वैज्ञानिक वैज्ञानिक शास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ हे मराठी भाषेतूनच शिकून पुढे आले हे नाकारून चालणार नाही.
तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्याची रुजवण फक्त मातृभाषेतच होऊ शकते. इंग्रजी माध्यमाचा विचार केला तर इंग्रजीही आंतरराष्ट्रीय भाषा आहे इंग्रजीवर प्रभुत्व मिळालेल्या मुलांना सर्वच क्षेत्रात संधी उपलब्ध होईल असे पालकांना वाटते म्हणून पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना घालत असतील असे जरी मान्य केले. तरी इंग्रजी माध्यमातून शिकलेले सर्वच विद्यार्थी यशस्वी होतात असे नाही.
उलट आज जे उच्च पदावर पोहोचलेले मान्यवर आहेत मग ते डॉक्टर इंजिनियर वकील साहित्यिक असो की शास्त्रज्ञ उद्योजक नेते अभिनेते सर्वच मराठी भाषेतून शिकलेले आहे आयएएस आयपीएस अधिकारी यांची यादी पाहिली तर त्यातील अनेक अधिकाऱ्यांची शिक्षण हे मातृभाषेतून झालेले आहे मागील काही वर्षात स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक संख्या मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे अमेरिका रशिया व जपान यासारख्या प्रगत देशातही मातृभाषेतून शिक्षण दिले जाते या देशातील पालक हेतूपुरेसर आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देतात मग आपल्या देशात इंग्रजी शाळांना शासन अमाप परवानगी देऊन काय साध्य करणार? मातृभाषेतूनच बालकाचा भावनिक सामाजिक मूल्यांची पेरणी फक्त मातृभाषेतूनच होऊ शकते. महाराष्ट्र बाबत बोलायचे झाले तर मुलांना इंग्रजीचे डोस पाजले तर इथली मराठी भाषेचा समृद्ध व सांस्कृतिक ठेवा लुप्त होईल की काय असे शक्यता बळावते बालकांमध्ये राष्ट्रभिमान राष्ट्रीय एकात्मता चांगल्या संस्काराचे बीज बिंब व्हायचे असल्यास मातृभाषाच काम येईल शिक्षणात मातृभाषेमुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. मातृभाषा ही संस्काराचा आणि संस्कृतीचा मानबिंदू आहे .जितक्या अलगदतीने मुलं मातृभाषेतून शिकतात तितक्या जलदगतीने इंग्रजीतून शिकत नाही म्हणून मातृभाषेतून शिक्षण हेच खरे शिक्षण आहे व्यक्तिगत मत.