
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या देवधरी ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहाराच्या विरोधात ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव यांनी ग्रामपंचायतीच्या खात्यातील निधी कामे न करता खर्च केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बंडू भारसकरे महादेव टेकाम यांनी केला आहे.या प्रकरणात दिनांक 13 ऑक्टोबरपासून बंडू भारसकरे महादेव टेकाम यांनी राळेगाव पंचायत समिती समोर उपोषणास सुरुवात केली होती. ग्रामपंचायतीतील निधीचा अपहार, पारदर्शकतेचा अभाव आणि विकासकामांतील भ्रष्टाचार यावर त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता.
आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी केशव पवार यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून समाधानकारक उत्तर दिले. त्यांनी संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिल्याने बंडू भारसकरे यांनी आपले उपोषण मागे घेतले.
यावेळी सर्व पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते बाळू धुमाळ, दिनेश गोहणे, संदीप तेलंगे, महादेव टेकाम, हर्षल उगे तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर भारसाकळे यांनी निंबूपाणी स्वीकारून उपोषण सोडले, यानंतर उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.या घटनेमुळे देवधरी ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहारावर पडदा उघडण्याची शक्यता निर्माण झाली असून ग्रामस्थांमध्ये याविषयी चांगलीच चर्चा सुरू आहे.
