
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरध येथे तलाठी मिलिंद नामदेवराव लोहात वय वर्षे 43 यांना मारहाण करून पळ काढलेल्या आरोपींना वडकी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून 48 तासाच्या आत अटक केली आहे ही घटना चार दिवसांपूर्वी घडली होती.
यासंदर्भात वडकी पोलिसांनी सांगितले की मिलिंद लोहात वय वर्ष 43 यांना मारहाण करणारे आरोपी प्रतीक दशरथ वाढोनकर वय वर्षे 34 राहणार वाढोना बाजार सतीश बाबुराव मडावी वय वर्ष 25 राहणार दादा बादशहा नगर राळेगाव आणि तिसरा आरोपी प्रमोद मोतीबाबा सोनुले वय वर्ष 25 या तिघांनी घटना घडल्यानंतर स्विफ्ट कार एम एच 32 वाय 4420 या वाहनाने पळून गेले होते सदर आरोपी पुणे, अहमदनगर, संभाजीनगर, कारंजा लाड, मूर्तिजापूर दर्यापूर, अंजनगाव असा प्रवास करीत पोलिसांना चकमा देत पळत असताना आरोपी पोलीस स्टेशन अचलपूर हद्दीतील ग्राम सिंधी जिल्हा अमरावती या ठिकाणी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले त्यांना अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आरोपीला अटक करण्यासाठी सायबर टीमची मोठी मदत मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले हे कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव बोरखडे, पी एस आय प्रशांत जाधव, पोलीस शिपाई किरण दासरवार आकाश कुदुसे विनोद नागरगोजे दीपक वाड्रसवार सचिन नेवारे यांनी केली आहे.
