
चिचपल्ली वनपरीक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या डोंगरहळदि बिटातील कक्ष क्रमांक ५२६ येथे जंगलात गायीला वाघाने मारल्याची घटना घडली मौजा गोमपाटील तुकुम येथील शेतकरी श्री.प्रफुल शंकर गेडाम यांची गाय जंगलात चरायला गेली असता दोन दिवस घरी न आल्याने श्री.प्रफुल गेडाम यांनी जंगलात जाऊन शोधाशोध केल्याने गाय मृत अवस्थेत आढळून आली त्यांनी सदर घटनेची माहिती डोंगरहळदि बिटाचे वनरक्षक श्री.बि.बि.मस्के यांना दिली असता त्यांनी आपली टिम घेऊन तात्काळ घटणास्थळ गाठून सदर मृतगायीचा पंचनामा केला असता वाघाने हल्ला करून ठार केल्याचे निदर्शणास आले सदर गायीचे मालक शेतकरी असून त्यांची आर्थीक नूकसान झाली आहे त्यांना शासनाकडून लवकरात लवकर आर्थीक लाभ मिळावा अशी मागणी गावकर्यांन कडून केली जात आहे सदर घटनेचा पंचनामा केळझर राऊंडचे वनपाल श्री.डि.एन.ढोले यांनी केला असून डोंगरहळदि बिटाचे वनरक्षक श्री.बि.बि.मस्के,वनमजूर श्री.सूनील गोविंदा बोबाटे घटनास्थळी उपस्थीत होते
