
सहसंपादक : रामभाऊ भोयर
सैनिक पब्लिक स्कूल, वडकी येथील विद्यार्थ्यांनी दैनिक सकाळ वर्तमानपत्राच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. या स्पर्धेत विविध गटांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट चित्र सादर करून परीक्षकांची मने जिंकली.
या स्पर्धेचे आयोजन दैनिक सकाळ यांच्यातर्फे करण्यात आले होते. स्पर्धेचे केंद्र सैनिक पब्लिक स्कूल वडकी हे होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात आणि सर्जनशीलतेने स्पर्धेत सहभाग घेतला. त्यांच्या कलेने नवे आयाम गाठले आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला मोठा वाव मिळाला.
या स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे :
अ गट: हिंदवी चित्तरंजन शेटे
ब गट: अवनी सुरेश धवक
क गट: स्वरा जी गौळकर
ड गट: अमर वृषभ पवार
या सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत मेहनत, चिकाटी आणि नावीन्यपूर्ण विचारांच्या आधारे ही यशाची शिखरे गाठली. त्यांचं हे यश केवळ शाळेसाठीच नव्हे, तर संपूर्ण राळेगाव परिसरासाठी गौरवाची बाब आहे.
शाळेचे प्राचार्य सचिन ठमके, जे CBSE चे रिसोर्स पर्सन देखील आहेत, यांचं मार्गदर्शन या यशामागे मोलाचं ठरलं. त्यांनी विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन दिलं असून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले आहेत.
या स्पर्धेच्या आयोजनामध्ये अध्यक्ष रणधीर सिंग दूहन आणि सचिव सत्यवान सिंग दुहन यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांच्या सहकार्यामुळेच हे भव्य आयोजन यशस्वीरीत्या पार पडले.सैनिक पब्लिक स्कूल वडकी ही शाळा केवळ शैक्षणिक गुणवत्तेतच नव्हे तर कला, क्रिडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही अग्रेसर राहिली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन, सुविधा व संधी येथे उपलब्ध करून दिल्या जातात.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, स्पर्धात्मकता आणि सर्जनशीलता या गुणांचा विकास झाला असून त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी हे यश एक प्रेरणादायी पाऊल ठरेल, यात शंका नाही.
— सैनिक पब्लिक स्कूल, वडकी
“गौरव आमचा, प्रेरणा तुमची!”
