
सहसंपादक : रामभाऊ भोयर
तालुक्यात ३१ ऑगष्ट २०२४ रोज शनिवार ला रात्री पडलेल्या अति मुसळधार पावसामुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे नुकसान झाले आहे त्या सदरील शेतकरी यांचे बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण हे महसूल ग्रामविकास व कृषी विभागाच्या कर्मचारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे शेतपिकाचे नुकसान झाले आहे, त्यांनी सदरच्या संयुक्त पंचनाम्यास उपस्थित राहून पंचनामे पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन राळेगांव प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
तसेच ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजना खरीप हंगाम २०२४ योजना राळेगाव तालुक्यात राबवण्यात येत आहे, यामध्ये शासन निर्णयातील पीक संरक्षणाच्या बाबी यातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास ,ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसूचित पिकाचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येतात अशी तरतूद आहे.
झालेल्या स्थानिक आपत्तीमध्ये पूर्वसूचना, माहिती ७२ तासांच्या आत कंपनीकडे नोंद करणे अनिवार्य आहे. त्यामुळे आपण पिकाच्या नुकसानीची पूर्वसूचना टोल फ्री क्रमांक १४४४७ सीएससी सेंटरच्या माध्यमातून सूचना नोंदवू शकता आणि क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central याचा वापर करून पूर्वसचना देऊ शकता. पूर्वसूचना दिल्यानंतर आपणास उपलब्ध करून दिलेला Docket Id सांभाळून ठेवावा अथवा पीक विमा पावतीवर लिहून ठेवावा. सदर पूर्वसूचनानंतर सर्वेक्षण होते व पुढील कार्यवाही केली जाते त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येते की, नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे व पंतप्रधान पिक विमा योजनेतील पूर्वसूचना देणे बाबत व खरीप हंगाम २०२४ च्या ई पीक पाहणी नोंद करून घ्याव्यात याबाबत प्रशासणाच्या (तलाठी , ग्रामसेवक व कृषिसहाय्यक ) संपर्कात राहून संबंधित कार्यावहीस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
