
सहसपादक: रामभाऊ भोयर
आयटक , महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना जिल्हा शाखा व तालुका शाखांच्या वतीने मा.जिल्हाधिकारी यवतमाळ,मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.यवतमाळ, मा.जिल्हा आरोग्य अधिकारी यवतमाळ, तसेच जिल्हातील सर्व मा.तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून त्यात आरोग्य विभागाच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने आभा कार्ड काढण्याचे काम आशा स्वंयसेविकांना व गटप्रवर्तक यांना दिलेले आहे त्या सर्व ऑनलाईन कामावर 29 डिसेंबर पासून आमचा बहिष्कार आहे असे कळविण्यात आले आहे.
तसेच शासनाने आधी कबूल केल्याप्रमाणे आशा वर्कर यांना रू.7000/- व गटप्रवर्तक यांना रू.10,000/-, दरमहा मानधन वाढ देण्याचे कबूल केलेली आहे तसेच त्यांना रू.2000/- भाऊबीज म्हणून देण्याचे कबूल केले आहे, तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दोन वर्षापूर्वी आशांना अॅन्डरॉईड मोबाईल देण्याचा निर्णय झालेला असतांना अद्यापही आशा वर्कर व गटप्रवर्तक महिलांना अॅन्डरॉईड मोबाईल मिळालेला नाही. त्यामुळे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना असो ई- केवायसी असो, किंवा आभा कार्ड काढण्याचे काम असो तसेच ऑनलाईन संपर्क करून देणे याशिवाय अनेक कामे आशा व गटप्रवर्तक महिलांना सक्तीने करावयास लावले जात आहे. आजही आशा व गटप्रवर्तक जमेल तसे ऑनलाईन पध्दतीने काम करीत होत्या प्ररंतु शासनाने मान्य केलेल्या मागण्याचा जिआर काढलेला नसल्यामुळे महाराष्ट्रातील आयटक सह इतरही संघटनांच्या कृती समितीच्या वतीने निर्णय घेण्यात आला शासनाने कबूल केल्याप्रमाणे 12 जानेवारीच्या आत जिआर काढावा अन्यथा 12 जानेवारी पासून आशा व गटप्रवर्तक राज्यव्यापी बेमुदत संपावर जानार आहे असेही कळविण्यात आले आहे
असी माहिती कॉ.दिवाकर नागपुरे, वंदना बोंडे, आशा बडेराव, रेखा मुधाने, सुहासिनी भगत, सुनीता सोनटक्के,विजया आत्राम, मालाताई इंगोले , सुनंदा कांबळे रंजना सोनोने , रंजना राउत , छाया खडककर , रवीना मुनेश्वर, मंगला रांखुडे, हर्षमाला पांडे ,
निता सोयाम ,शीतल येसेकार ,सारीका येरमे , मंगला शेळमाके , योगीता करमणकर , लक्ष्मी बोडुवार , दीपमाला ठाकरे, सीमा लिंगणवार, सुजाता पुनेकर , वर्षा कुळमेथे, रेखाताई होले , किरण कांबळे, उज्वला पाझारे, ममता क्षीरसागर , सिमा पाटील, विजया तायडे, गंगाबाई घुमे , शैला दातार, समशाद पठाण , योगीता हेमने , ज्योत्स्ना दुधे, माया इंगोले, राखी पवार, गीता जाध, शीलाताई भगत , छाया राठोड, चंचल केदार, दैवमाला खंदारे, रिना कौडुलवार , शोभा राहुल वाड, कांता खरवडे , संगीता आडे , अंजना कुरूकुटे , विजया शेखावत , शील्पा राठोड, किरण राठोड, शुंभागी सुकळकर, शालीनी ढोके, सुजाता खाडे, वर्षा वानखडे, बबिता चिंचोळे, गुंफाताई गेडाम,छबुताई इंगोले, वंदना लोणारे ,अजंना वानखडे, कविता जाधव, साधना भगत , सविता बरडे ,विद्या लेंडे , छाया पाटील, सुनीता धोटे , कल्पना कांबळे, रंजना वानखडे, सुनीता कुंभारे , ज्योती गुडेकार , वैशाली खीरटकर , लताबाई डाखोरे, सुधा मेश्राम, सुनीता, चव्हाण, वंदना वाळुकर, प्रतिभा ढोकने ,सनिता जयस्वाल यानी कळविली आहे..
