
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित के बी एच विद्यालय पवन नगर येथे येथे जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा मा.संपदा दिदी हिरे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळेत जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्त प्रमुख पाहुणे डॉक्टर हितेश भंदुरे हे लाभले होते त्यांनी आरोग्य विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी केली कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आप्पा पवार यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती दिली याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक उमेश देवरे महिला तक्रार निवारण समिती प्रमुख एस एम पाटील शाळेतील शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
