
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी पासून जवळच असलेल्या मौजा कृष्णापुर येथे वाघाने हल्ला करून गाय ठार केल्याची घटना घडली यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे
कृष्णापुर येथील शेतकरी रंगराव मिटकरे यांच्या शेतात दि.२ ऑक्टोबर २०२३ रोजी ही घटना घडली नेहमीप्रमाणे रंगराव मिटकरे हे आपल्या शेतातील दैनंदिन काम आटोपून शेतातील गाईला रोजच्या जागी गोट्यात बांधून घरी आले व सकाळी जाऊन बघितल्यानंतर ही घटना त्यांच्या लक्षात आली या घटनामुळे सदर शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून होणाऱ्या वारंवार जनावरांच्या हल्ल्याने शेतकरीवर्ग पूर्णपणे भयभीत झाला शिवाय शेतकऱ्याचे धन म्हणून गाय व इतर पाळीव जनावर असतात होत असलेल्या सततच्या हल्ल्यामुळे सध्या कृष्णापूर शेत शिवारातील शेतमजूर, शेतकरी भय्यावह अवस्थेत आहे. विशेष म्हणजे रंगराव मिटकरे याचे शेत हे जंगलाच्या कडेला सुद्धा नाही जंगलामध्ये वावरणारे हिंस्त्र प्राण्यांची मजल आता गावापर्यंत पोहोचली आहे तसेच दुसऱ्या दिवशी पुन्हा वाघाने का म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची चर्चा आहे दुसऱ्या जनावरावर हल्ला झाला ते ठिकाण तर अगदी गावाला लागूनच असल्याचं सांगण्यात येते अशा पद्धतीने व इतक्या जवळ येऊन हल्ला करून पाळीव जनावरावर हल्ला केल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी मोठ्या संकटात सापडत असताना वनविभाग करतो तरी काय?? हा प्रश्नच आहे काही दिवसापूर्वी गोविंदपुर येथील युवकावर अस्वलाने हल्ला करून रक्तबंबा केले होते कृष्णापुर शेतीवरात उसाचे पीक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दिवसभर जंगलामध्ये वावरणारा प्राणी उसामध्ये सुद्धा दबा धरून बसू शकतो त्यामुळे शेतकरी कामाला जाणारा मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात दहशतीत असून वनविभागाने या हिस्त्र असलेल्या वाघाचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना व मजूर वर्गाला भयमुक्त करावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे तसेच सदरच्या प्रकरणात वनाधिकाऱ्याने पंचनामा केला आहे.
