माझी वसुंधरा अभियानांतर्गत कळंब येथे वृक्षारोपण

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

नगर पंचायत कळंब वतीने माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश- निसर्गाचे हे पंचतत्व तसेच वसुंधरेप्रति आपली जबाबदारी म्हणून पृथ्वी तत्वाखाली प्रभाग क्रमांक ०७ येथील स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आज दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३ रोजी घेण्यात आला. प्रत्येक नागरिकाने एक वृक्ष लावून जोपासला पाहिजे, तरच पर्यावरण टिकेल,असे मनोगत स्वच्छता दुत प्रशांत डेहनकर यांनी व्यक्‍त केले. यावेळी मा. श्री. योगेश धांदे (नगरसेवक), न.पं प्रशासकीय अधिकारी सुनील मगर, बसवेश्वर माहुलकर, राजेंद्र सारडे, अविन वेल्के, अमित मोहनापुरे, सुनील डकरे, पुनेश्वर चांदवे, नारायण रोहणे, खुशाल ठाकरे, आदित्य कळमकर, प्रदिप मोहोळ, रंजीत हिवरे, अतुल चतुळपाळे, आनंद समुद्रे, उमेश दानवेकर, सुरज समुद्रे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पिंपळ, वड, निंब, आवळा इत्यादी स्वदेशी वृक्षांची लागवड करण्यात आली.