
राळेगाव येथे दि.3 एप्रिल 2023 रोजी , प स राळेगाव येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सेवार्थ पाणपोई चे उद्घाटन करण्यात आले . व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा राळेगाव यांनी आपली परंपरा कायम राखत सामाजिक बांधिलकी जपली.
सदर उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी, कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ विस्तार अधिकारी आ. सरलाताई देवतळे,तर उद्घाटक म्हणून श्री.संजयजी चौबे साहेब (ठाणेदार राळेगाव पो. स्टे,राळेगाव ), वनंलवार साहेब, सह.प्रशासन अधिकारी प. स तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच झाडगाव श्री. मोहन भोयर व श्री दिनेश फुटाणे साहेब लेखाविभाग प्रमूख लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री महेश सोनेकर सर (अध्यक्ष)समिती राळेगाव यांनी केले. सूत्रसंचालन श्री. अमोल पोहनकर(सहसचिव)समिती यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार श्री. हेमंत सिडाम (सचिव) यांनी केले तर
मनोगत व्यक्त करताना. श्री. चौबे साहेब यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम असा उल्लेख आपल्या मनोगतात केला. व आपले समाजकार्य उत्तरोत्तर वाढत जाऊन गरजूंना जास्तीत जास्त लाभ मिळावा असे मत प्रतिपादन केले.तर देवतळे मॅडम यांनी अतिशय स्तुत्य सामाजिक बांधिलकी आपण जपत असल्याचे प्रतिपादन केले.तर माजी सरपंच झाडगाव यांनी प स प्रशासनातील उणिवा शोधून त्यावर आपण संघटनेच्या माध्यमातून उपाय योजना करावी असे मत मांडले. सदर कार्यक्रमाला खालील पदाधिकरी उपस्थित होते.
श्री. सुभाष पारधी. कुणाल सरोदे
संजय एकोंकर,संजय चौधरी
गुणवंत इंगोले ,संदीप टूले
योगेश गला ट ,हनुमान जुमनाके
नरेंद्र घा टो ल , विजय दुर्गे
डोंगरे सर ,सीताराम वागधरे
राजेंद्र खुडसंगे,विनायक सातकर
अविनाश ठाकरे,सुनील चौधरी
संदीप इखार ,प्रज्ञा पाटील
पुष्पा गेडाम, मनीषा ताम्हण
आदी पदाधिकारी उपस्थित होते.
