
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वनोजा येथील ग्रामपंचायत सरपंचपदाचा ठरल्याप्रमाणे अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे मागील सरपंचांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर सरपंच पदासाठी निवडणूक लागेपर्यंत उपसरपंच प्रभाकर दांडेकर ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळत होते त्यानंतर दिनांक 13/1/2024 रोज शनिवारला नवीन सरपंचपदासाठी कार्यवाही करण्यात आली त्यावेळी सरपंचपदासाठी मालुताई दिनेश कोटनाके यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांना नवनिर्वाचित सरपंच म्हणून घोषित करण्यात आले.या पदासाठी उपसरपंच प्रभाकर दांडेकर यांनी मालुताई कोटनाके यांचे नाव सुचविले.त्यावेळी उपस्थित सदस्य शालिनी तायवाडे,चंदाताई पोटूरकर, संजय आत्राम, सुनिता कुळसंगे, चंद्रशेखर उगेमुगे यांनी नवनिर्वाचित सरपंचासोबत आम्ही असल्याचे घोषित केले.त्यावेळी गावातील प्रतिष्ठित डाॅ.पुरुषोत्तमराव उगेमुगे,अशोक काचोळे, प्रफुल्ल तायवाडे,सतिश बुरले, भास्कर काचोळे, संतोष वाघाडे, मोरेश्वर वटाणे, नामदेव खोडे यांनी अविरोध निवडणूक होण्यासाठी सहकार्य केले.
