
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम
पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा बुज येथील श्री घनश्याम घोटेकर यांचे घर जळून खाक झाले. यामध्ये त्यांचे घरातील सर्व सामान तसेच शेतीउपयोगी वस्तू जळून खाक झाले. याची माहिती मिळताच. मा.आमदार तथा पालकमंत्री चंद्रपूर सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आर्थिक मदत केली. यावेळी स्थळाची पाहणी करून संबंधित अधिकऱ्याशी मा सुधीर भाऊ फोन वरून संपर्क करून शासकीय मदत देण्याचे निर्देश दिले.यावेळी अल्काताई आत्राम प्रदेश महामंत्री म.रा , तुळशीराम रोहणकर अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती,अजय मस्के युवा मोर्चा अध्यक्ष, विनोद मारशेट्टीवार भाजपा थोवाजी घोटेकर भाजपा,नेरु मोरे युवा मोर्चा कार्यकर्ता , दिनेश घोडे, घनश्याम घोटेकर व त्यांच्या परिवारातील सदस्य, गावकरी उपस्थित होते.
