जिल्हास्तरिय मैदानी स्पर्धेत स्माॅल वंडर्स काॅन्व्हेट वडकीच्या विद्यार्थांची निवड


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


क्रिडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय,यवतमाळ यांच्या संयुक्त विध्यमानाने आयोजित शालेय तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत स्माॅल वंडर्स काॅन्व्हेटची विद्याथिर्नी कु. मोनाली किशोर कुंभलकर हिने २०० मी. धावणे मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला, तर ऋतुजा प्रवीण धोटे हिने गोळा फेक मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला, तर मुंलामध्ये अोम राजेश येपारी याने १०० मी. धावणे या मध्ये व्दितिय क्रमांक पटकाविला. या विद्यार्थांची जिल्हास्तरिय मैदानी स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. या मिळवलेल्या यशामुळे या विद्यार्थ्यावर वडकी खैरी परिसरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. ह्या मिळालेल्या यशाचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका कु. मंजुषा दाै. सागर , क्रिडामार्गदर्शक शंकर मालखेडे व शाळेतील शिक्षकवृंद अहमद शेख , गवळी , भेदुरकर , शनौ शेख या सर्वांना देण्यात आले आहे. या सर्वच विद्यार्थांचे अभिनंदन व कौतुक संपुर्ण परिसरात होत आहे.