वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा करून केला आर्थिक सहयोग,मुन दाम्पत्याने जपली सामाजिक बांधिलकी

हिंगणघाट/ प्रमोद जुमडे

गडचिरोली येथील विवेक मून व ग्रीष्मा मून या सामाजिक कार्यकर्त्यानी यांनी आपल्या संकल्प या लहान मुलाचा ६ वा वाढदिवस हिंगणघाट येथील निराधार बेघर लोकांचे वृद्धाश्रमात फळे, अल्पपोहार, व नगदी सहकार्य राशीं देणगी देऊन साजरा केला. या सर्व आजी व आजोबां सोबत केक कापून साजरा केल्या मुळे सर्वच जण आपल्याच नातवा सोबत आहोत अशी भावना व्यक्त केली. सर्वच जेष्ठ आनंदी व सुखी राहावे अशी प्रार्थना मून परिवारी केली व पुढे सुद्धा आम्ही या आश्रमात येऊन उपक्रम घेत राहू अशी ग्वाही दिली.सदर सामाजिक उपक्रमात विवेक मून, सौ. ग्रीष्मा मून, चि. विकल्प मून, मधुकर पाटील, बाजीरावं भगत, प्रभाकर ढाले,योगेश राठोड,कमालकर वनकर,तृप्ती थुल, केवलदास ढाले,निर्मला भगत, विनोद वनकर,संविधान ढाले, आर्यन थुल, शेजल, मानसी रिद्धीमा तसेच जीवन ज्योती महिला ग्रामीण विकास संस्थे च्या अध्यक्ष वैशाली पालांडे, श्री अतुल पालांडे, सुचिपाटील,शुभम खैरे, नगराळे आदी नी उपक्रमात मोलाचे सहकार्य केले.