
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पो स्टे राळेगाव येथे श्री भीमराव कोकरे यांनी दिलेल्या रिपोर्ट वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी सदर गुन्ह्यात 24 तासाच्या आत आरोपी नामे 1) रुपेश वसंता वगारहांडे रा.झरगड व 2) सुनील भारतराव मेश्राम वय 25 वर्ष रा.झरगड यांना गुन्ह्यात अटक करून सखोल तपास केला असता आरोपी त्यांनी नमूद गुन्ह्यातील चोरी गेलेली मोटर बाबत माहिती दिल्याने त्यांना पोस्टे दाखल अप क्रमांक 759/23 कलम 379 भादवी बाबत देखील विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील मोटर देखील चोरी केल्याची कबुली दिली आहे. वरून सदर दोन्ही गुन्ह्यातील मुद्देमाल आरोपीतांकडून पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे.आरोपीना विद्यमान न्यायालयात हजर करून अधिक तपास करीत आहोत.
सदर कारवाई श्री डॉ. पवन बनसोड पोलिस अधीक्षक यवतमाळ, अपर पोलिस अधीक्षक श्री पियूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री रामेश्वर वेंजणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रामकृष्ण जाधव.पोलिस निरीक्षक राळेगाव, पो उप नि निलेश गायकवाड, पो उप नि मोहन पाटील,पो का प्रशिक जीवने यांनी पार पाडली
