शिवसेनेचे संजय राऊत यांना जामीन, ढाणकी शहरात जल्लोष


प्रतिनिधी :प्रवीण जोशी ,ढाणकी


मागील अनेक दिवसांपासून तुरुंगात असलेले शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना बुधवार दिनांक 9 ऑक्टोबरला न्यायालयातून जामीन मिळाला ही वार्ता मिळताच ढाणकी शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्याच्या आतिष बाजी केली. पत्रा चाळीच्या जमीन व्यवहारात अनियमितता केल्याचा ठपका ठेवून तीन महिन्यापूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांना अटक केली होती. त्यामुळे राज्यभरातील शिवसैनिक कमालीचे दुखावले होते. प्रखर विरोध करूनही न्यायालयाने बुधवारी त्यांना जामीन मंजूर केल्याने शिवसैनिकांना आनंदाचे वातावरण निर्माण झाले . त्या आनंदाच्या भरात शहरातील शिवसैनिकांनी फटाक्याची आतिश बाजी केली.
शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांना संकटातून निघण्याची जणू बाळकडूच पाजले कितीही संकटाची मालिका असली तरी तितक्या जोराने प्रतिकार करायचा अशी कडवट शिकवण माननीय बाळासाहेबांनी दिले म्हणूनच अनेक आमदार खासदार आले व गेले पण शिवसेना तितक्या शक्तीने उभी राहिली व आजतागायत अभेद्य आहे. विशेष गेल्या अनेक काळापासून “इडी शास्त्र” कोणालाही माहीत नव्हते पण मागील काही दिवसांपासून ईडीचे नाव सर्वांना माहीत झाले जो विरोधात बोलेल त्यांच्यावर या कार्यालयाची कारवाई हमखास जणू. कोणताही प्रादेशिक पक्ष हा ज्या त्या राज्याची अस्मिता घेऊनच वाढतो व तेथील जनता सुद्धा प्रादेशिक पक्षालाच भरघोस मताधिक्याने सातत्याने निवडून देत आहे. असे असताना कारस्थान करून प्रादेशिक पक्ष संपविण्याचे चित्र सध्यातरी राज्यांमध्ये दिसत आहे. शेतकऱ्याची एवढी मोठी दैना अवस्था असताना एकाच पक्षाचे दोन गटात विभागणी होणे राज्याला परवडणारे नाही मागील काही दिवसात राज्याच्या राजकारणात होत असलेली हालचाल जनतेने बघितले त्यामुळे येणाऱ्या काळातील मतदार राजा नक्कीच या बाबीचा विचार करेल एवढे नक्की.