आदिवासी च्या न्याय हक्कासाठी “‘ बिरसा जयंती महोत्सव”‘ सामाजिक एकता दिवस म्हणून साजरा करणार – गोंडवाना गणतंत्र पार्टी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर


गोंडवाना गणतंत्र पार्टी ही सर्व समाज घटकांतील जनतेच्या न्याय हक्कासाठी सतत कार्यरत आहे, समाजातील गरीब, श्रीमंत दलित निराधार, अपंग व्यक्तीं साठी कामं करतं आहे प्रत्येक क्रांती कारक थोर पुरुषांची जयंती ही सामाजिक एकतेचे प्रतिक आहे म्हणून गोंडवाना गणतंत्र पार्टी १५ नोव्हेंबर हा दिवस बिरसा जयंती महोत्सव “‘ सामाजिक एकता दिवस “‘ म्हणून साजरा करणार असे मतं मा.मधुसुदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी व्यक्त केले आहे

गोंडवाना गणतंत्र पार्टी चे जिल्हा पदाधिकारी आणि तालुका पदाधिकारी मिळुन बिरसा जयंती महोत्सव आयोजित करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते सभेचे अध्यक्ष मा.मधुसुदन कोवे गुरुजी होते बैठकीत उपस्थित मा.विठ्ठलदादा धुर्वे जिल्हा अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी यवतमाळ मा विशाल भाऊ वाघ जिल्हा अध्यक्ष ( ओ बी सी सेल ) मा.विजयाताई रोहणकर जिल्हा अध्यक्ष ( महिला ) मा ज्ञानेश्वर कुमरे जिल्हा कार्याध्यक्ष गों ग पा मा हणुमान टेकाम तालुका अध्यक्ष कळंब मा राजेंद्र मडावी बाभुळगाव मा विनोद भाऊ पराते राळेगाव मा कुळसंगे साहेब, सुरपाम काका पंकज मडावी पंधरे दादा कुमरे ताई सुरपाम ताई बैठकीत उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन आणि सुत्र संचालन मा राजेंद्र येडमे जिल्हा उपाध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी यवतमाळ यांनी केले

                   -.