
प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक
के.के.वाघ महाविद्यालय ते जत्रा हॉटेल उड्डाणपूल तातडीने सुरु करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष मा.श्री.अंबादास खैरे यांनी राष्ट्रीय महामार्ग ३ चे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक बी. साळुंखे यांना दिले. उड्डाण पूल सुरू नसल्याने ज्यांना थेट नाशिक च्या बाहेर जायचे आहे अशा अवजड वाहनांना सध्या शहरातून जावे लागत आहे आणि या मुळे अपघातांची शक्यता वाढली असून द्वारका चौकात रोजची वाहतूक खोळंबा होत असून नागरिक त्रस्त असल्याच्या तक्रारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडे येत होत्या आणि म्हणून उड्डाण पूल लवकर सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी मुकेश शेवाळे, विशाल डोखे, राहुल कमानकर, संतोष भुजबळ, अक्षय पाटील, सचिन जगताप, बाळासाहेब जमदाडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
