



तिरोड़ा – विद्यार्थ्यांना व्यवहारात उपयोगी पडेल असे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे म्हणुन जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा येथे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत 2015-2016 पासून विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख बनविण्यासाठी ऑटोमोबाइल व मल्टीस्किल व्यवसाय अभ्यासक्रम वर्ग 9 वी ते 12 वी पर्यंत शिकविले जाते.
व्यवसाय शिक्षणाचा दर्जा आणि याचे महत्त्व हे वर्ग बारावी परीक्षेच्या रिजल्ट वर दिसत आहे, तब्बल तीन वर्षापासून जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा येथील ऑटोमोबाइल विषयाचे विद्यार्थी सतक (100) पटकावित आहेत.
फेब्रुवारी 2023 च्या HSC परीक्षेत ऑटोमोबाईल विषयात 3 विद्यार्थ्यानी 100 पैकी 100 गुण मिळविले, यात आदित्य भाऊदास जगनाडे (खोपड़ा/बहीवाड़ा), तृप्ती ओमप्रकाश जांभुळकर (चिरेखनि), निकिता अंकुश लीलहारे (सालेबड़ी) यांनी विषयात पूर्ण गुण मिळवून व्यवसाय शिक्षणाचा दर्जा वाढविला आहे.
सुयश प्राप्त व्यवसायाभिमुख विद्यार्थ्यांचा आभार विषय शिक्षक उमेंद्र हिवराज रहांगडाले व प्राचार्य श्री. मा. जी. एच. रहांगडाले यांनी मानले.
