सफाई कामगार यांच्या साखळी उपोषणाचा सहावा दिवस


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


नगरपंचायत राळेगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या मेहतर समाज सफाई कामगार यांनी आपल्या आपल्या लहान मुलबाळ समवेत विविध मागण्याच्या संदर्भात तहसील कार्यलया समोर दिं २२ डिसेंबर २०२२ पासून साखळी उपोषणाला बसले असून त्यांचा उपोषणाचा दिं २७ डिसेंबर २०२२ हा सहावा दिवस असून सुद्धा त्यांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
सफाई कामगार राळेगाव यांच्या रास्त असलेल्या मागण्या शासनाचे परिपत्रकानुसार कोणतेही अजून पर्यंत पूर्णत्वास केलेले नाही,नगरपंचायत आकृती बंधामुळे तसेच स्थायी अस्थायी पदामुळे कोणताही सफाई कर्मचाऱ्यांच्या वारस हक्काच्या निवडणुकीसाठी अडचण निर्माण होत नसल्याबाबतचं अशी एक मागणी त्यांची आहे, नगरपंचायत अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सफाई कर्मचारी किमान वेतन व विशेष भत्ता देण्याबाबत अशी सुद्धा दुसरी मागणी आहे, तसेच लाड समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती बाबत वारसा हक्काची अंमलबजावणी पुढे चालू ठेवण्याबाबत तसेच नवनिर्मित नगरपंचायत मध्ये तत्कालीन ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या समावेशासाठी विहीती अटी व कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याबाबत, तसेच कर्मचाऱ्यांच्या समावेश आकृती बंधातील पदावर करण्याबाबत नगरपंचायत मधील सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा दहा टक्के रक्कम परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत होणारी कपात थांबविण्यात येऊन, कपात केलेले रक्कम तात्काळ परत देण्यात यावी तसेच कोविड १९ च्या अनुषंगाने नागरी भागात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना १००० इतकी प्रोत्साहन पर रक्कम देण्यात यावी, तसेच नगर विकास विभाग यांचे पत्र दिं १७ जून २०१९ मधील अ क्रमांक तीन मध्ये ११ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णय मुद्दा क्रमांक ३(३) नुसार अनुसूचित जाती व्यतिरिक्त अन्य प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती न देण्याबाबत तसेच नगरपंचायती क्षेत्रातील कोविड विरोधी मोहिमेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना सानुग्रह सहाय्यक अनुदानासाठी उघडण्यात आलेल्या नवीन लेखाशीर्षक शिरसानुसार ५० लाख रुपये देण्यात यावे, तसेच नवनिर्मित नगरपंचायतीच्या आकृतीबंधातील वर्ग तीन व चार च्या मंजूर व रिक्त पदावर तात्कालीन ग्राम पंचायत मधील सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यात यावे, तसेच आकृतीबंधातील पदासाठी आवश्यक असणाऱ्या वीहीत तांत्रिक अहर्ता पूर्ण न करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण पूर्ण करण्याची संधी देऊन त्यांचे समावेशन करण्यात यावे, तसेच नगरपंचायत मधील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने विविध कालावधीत नियुक्त देण्याबाबत व देण्यात याव्या, तसेच नगरपंचायतींना दरमहा प्राप्त होणाऱ्या सहाय्यक अनुदानातील सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांची थकीत ध्येय रक्कम देण्यात यावी व सेवानिवृत्तीनंतर त्यांना आर्थिक लाभ देण्यात यावे या विविध मागण्यांसाठी उपोषला बसले असून या उपोषण कर्त्यांच्या मंडपाला अद्यापही संबधित प्रशासनाने कोणतीही दखल न घेता उलट त्यांना कारवाई करण्याची नोटीस देण्यात आली आहे. उपोषण कर्त्यांनी नगरपंचायत उपोषणाला बसण्याबाबत पत्र दिले असतांना सुद्धा नगरपंचायतीने शहरात घनकचरा व्यवस्थापन कामाचे नियोजन विस्कळीत झाले कामावर त्वरित हजर व्हावे अन्यथा आपणावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असे पत्र देण्यात आले आहे . मात्र यावेळी उपोषण कर्त्यांनी आमच्या मागण्या मान्य न करता उपोषण दडपण्याचा प्रयत्न नगर पंचायत करीत असल्याचे उपोषण कर्त्यांनी सांगितले असून जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे उपोषण कर्त्यांनी सांगितले आहे.