
सहसंपादक : रामभाऊ भोयर
न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथे 8 सप्टेंबर ला जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून शाळेत भव्य शालेय विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनी च्या निमित्त 44 विज्ञान प्रदर्शन प्रतिकृती सादर करण्यात आल्या यावेळी शाळेतील विज्ञान प्रदर्शनी मध्ये सहभागी विदयार्थ्यां मध्ये उत्साहाचे वातावरण होते .
या शालेय विज्ञान प्रदर्शनी चे उदघाटन तालुका गटशिक्षणाधिकारी नवनाथ लहाने, यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख आत्राम, मुख्याध्यापक विजय कचरे,पर्यवेक्षक सूचित बेहरे, जेष्ठ शिक्षक विनोद चिरडे.यावेळी उपस्थित होते… तसेच शाळेतील विज्ञान शिक्षक मनीषा इखे, संजय चिरडे, करुणा महाकुळकर,सोनाली काळे, निलेश गोरे,सचिन दहिकर,रेश्मा भोयर,हे शिक्षक यावेळी उपस्थित होते. शालेय विज्ञान प्रदर्शनी या कार्यक्रमाचे प्रास्तविक विनोद चिरडे यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन सचिन दहिकर यांनी तर आभार प्रदर्शन कु. सोनाली काळे यांनी केले.
