चिचोर्डी ग्रामपंचायत विकास कामापासून कोसो दूर

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड

हिमायतनगर पासून काही किमी अंतरावर असलेल्या चिचोर्डी हे गाव पहाडी दुर्गम भागात आहे तेथील लोकसंख्या जेमतेम असुन गावातील लोकांसाठी आरोग्य उपकेंद्राची भव्य इमारत लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेली असताना मात्र काही विकास अजुन ही तसतसं दिसुन येतात गावाच्या विकासासाठी सरकार लाखो रुपये निधी उपलब्ध करून देतो मात्र हा निधी जाते कुठे असा प्रश्न सामान्य नागरिकांना उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून जे भौतिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरीकानी गटविकास अधिकारी यांच्याकडे धाव घेतली त्या मध्ये लाईट नसने पंधरा वित्त आयोगाच्या माध्यमातून जे विकासासाठी निधी आलेला असताना तो निधी कुठं खर्च केला याची चौकशी का होत नाही पावसाळ्यात देखील पाण्यासाठी लोकांना का भटकंती करावी लागत आहे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे असे निवेदन गट विकास अधिकारी यांच्या कडे देण्यात जर का गावातील समस्या सोडविल्या नाही तर आम्ही ग्रामपंचायत समोर मुंडण आंदोलन करु असा इशारा सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक छत्रपती भिसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.