झाडगाव येथील विज्ञान शिक्षक विशाल मस्के यांनी बनविली चंद्रयान प्रतिकृती

राळेगाव तालुक्यातील झाडगाव श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आठ नव दहाव्या वर्गाला गणित आणि विज्ञान विषय शिकविणारे विषय शिक्षक हे कळंब तालुक्यातील बेलोरी गावचे रहिवासी असून हे या विद्यालयात नोकरीला रूजू झाले तेंव्हापासून नॅशनल लेव्हल ईंन्सपायर अवार्ड दिल्ली येथे विद्यार्थ्यीनी वैष्णवी भालचंद्र केवटे यांचे सह सहभागी झाले होते.त्याही नंतर अनेक वेळा तालुका, जिल्हा विज्ञान प्रदर्शनात सहभागी झाले आहेत.याच विशाल मस्के सरांनी हे चंद्रयान माॅडल व चंद्रावरील सेल्फी पाॅंईंट कमीत कमी खर्चात बनविला असून हा एक प्रकारचा ग्रामीण शिक्षकांनी यशस्वी केलेला प्रयोग आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी एक चांगला उपक्रम असून अशाच प्रकारे हा केलेला चंद्रयानाचा प्रयोग आता नुकताच जिल्हा विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांना शिक्षकांना पाहण्यासाठी ठेवला होता.या बनविलेल्या चंद्रयानासाठी त्यांना शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ.जयश्री राऊत मॅडम उपशिक्षणाधिकारी प्रदीप गोडे सर यांचे मार्गदर्शन लाभले असून हा उपक्रम बनविणे सुरू असताना मुख्याध्यापक,शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवाचे सहकार्य लाभल्याचे विशाल मस्के सरांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले ‌