कार्तिक महिन्यातील काकड आरतीचा कृष्णापूर येथे समारोप गेल्या अनेक दिवसांपासून अविरतपणे चालू आहे परंपरा


प्रतिनिधी प्रवीण जोशी
ढाणकी


कार्तिक महिन्यातील काकड आरतीची सांगता मौजा कृष्णापुर येथे झाली. यात अनेक गावकरी लोकांनी सहभाग घेतला व कार्यक्रमाची सांगता अतिशय यशस्वीरित्या पार पडली. शरीराला उत्साह पूर्ण आणि निरोगी ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे विविध कॅल्शियम व प्रथिनांची गरज असते. व ते आपल्याला विविध अन्नामधून व फळांमधून प्राप्त होत असते तसेच मनाला सुदृढ ठेवण्यासाठी व त्याची सुक्त अवस्था मोडून चेतन युक्त व प्रफुल्लित राहावे यासाठी काकड आरतीचे प्रयोजन साधू संतांनी केले असेल.
ईश्वराला जागृत करण्यासाठी प्रातःकाळी केली जाणारी आरती म्हणजेच काकड आरती यावेळी देवाच्या प्राण प्रतिष्ठित मूर्तीला काकडा आणि म्हणजेच ज्योतीने ओवाळले जाते. आळस चैनी आरामदायी वृत्ती नकारार्थी विचार नष्ट होऊन नेहमी सखारार्थी व टवटवीत राहावे असा त्यामागील सार होय.
“सत्व रज तमात्मक काकडा केला भक्तिस्नेहे युक्त चेतविला”!
वारकरी संप्रदायात काकड आरतीला फार पूर्वीपासूनची परंपरा आहे ग्रामीण व शहरी भागातील अनेक ठिकाणी प्रभातकाळी या आरत्यांचा सू स्वर अनेक ठिकाणी ऐकायला येतो तसाच कृष्णापुर गावात सुद्धा अखंडपणे काकड आरती चालू होती व विशेष म्हणजे यावेळी काकड आरतीची ही परंपरा तरुणांकडे सोपविली व त्यांनी ती तितकेच तत्परतेने पार पाडली.
“भक्तीचे पोटी बोध काकडा ज्योती पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती”
अशा विविध रचना गेल्या एक महिनाभर कृष्णापुर गावात प्रातःकाळी ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरात ऐकू येत होत्या तसे बघितले असता वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर शरद पौर्णिमा अर्थातच शेतकरी बांधवांच्या नवान पौर्णिमेपासून कडाक्याच्या थंडीची चाहूल लागते व सकाळी दवबिंदू पडतात लवकर उठून कामाला लागावे व भल्या प्रातःकाळी लवकर उठण्याची व कामाला जाण्याची सवय कायम राहावी तोच उत्साह हिवाळभरही टिकावा अशी या काकड आरती मागील शुद्ध व सात्विक भाव असेल.
“उठा उठा हो साधुसंत साधा आपले हित गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत”
अशा प्रकारचे भारुडे कवणे कार्तिक मासामध्ये ऐकायला येत होती.यावेळी मधुकर बोडखे,विष्णू, हुलकाने , अवधूत नलावडे, निरंजन माने, दीपक भोयर, सोमनाथ शक्करगे, अवधूत भोयर, सुमित लाठे, शुभम शक्करगे, पवन बाभळे, संदीप नलावडे पाटील. इत्यादी व अनेक लोकांची व समस्त गावकरी बांधवांची उपस्थिती होती.