अखेर तीनही महिला शिक्षिकांना परत मिळाली नोकरी
गजानन ऊल्हे यांचा महिला शिक्षिकाद्वारा जाहीर सत्कार!

सहसंपादक: रामभाऊ भोयर

    

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णि येथील आश्रम शाळेवरील सुनिता गुजर, प्रणाली गणोरकर व सपना निरगुडवार या तीन महिलां शिक्षिकांना संस्थेद्वारा अत्यंत अन्यायकारकपणे निलंबित करण्यात आले होते. सदर तीनही महिला शिक्षिकांनी या निलंबनाविरुद्ध प्रोटान शिक्षक संघटनेचे अमरावती विभागाचे विभागीय अध्यक्ष गजानन ऊल्हे यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने प्रोटान शिक्षक संघटनेच्या वतीने आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालय अमरावती यांच्या कार्यालयावर शेकडो कार्यकर्त्यांसह बेमुदत आंदोलन छेडले होते. त्यामुळे आदिवासी विभाग अप्पर आयुक्त यांनी सदर तीनही महिला शिक्षकांचे निलंबन बेकायदेशीर असून त्यांना तात्काळ नोकरीवर रुजू करून घ्यावे असे आदेश दिले होते. प्रोटान शिक्षक संघटनेच्या वतीने हे आंदोलन एकाच दिवशी नाशिक मुंबई व अमरावती या तीनही ठिकाणी अत्यंत आक्रमकपणे केल्या गेले होते. त्याची दखल घेत तात्काळ आदेश होऊन सदर तीनही महिला शिक्षिकांना आज रोजी संस्थाचालकांनी कार्यावर रुजू करून घेतले असून निलंबन काळातील 07 महिन्यांचे संपूर्ण वेतनही या शिक्षीकांच्या खात्यात जमा झाले आहे. या आनंदाच्या प्रसंगाचे अवचित्य साधून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तीनही महिला शिक्षिकांकडून त्यांच्यावरील अन्यायाची लढाई लढणारे निडर नेतृत्व प्रोटान शिक्षक संघटनेचे अमरावती विभागाचे विभागीय अध्यक्ष गजानन ऊल्हे यांचा तीनही महिला शिक्षिकांनी सहपरिवार सत्कार केला. कार्यक्रमाच्या प्रसंगी तीनही महिला शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना निलंबन काळातील सात महिने त्यांना व त्यांच्या कुटुंबांना काय? काय ? यातना सहन कराव्या लागल्या याचे वर्णन केले. हे वर्णन करीत असताना, त्यांचे डोळे पाणावले होते व कार्यक्रमातील वातावरणही भाऊक झाले होते. प्रोटान शिक्षक संघटनेने जर आम्हाला वेळेवर साथ दिली नसती तर आम्हाला आमच्या परिवारास रस्त्यावर यावे लागले असते असे म्हणत सदर शिक्षीकांनी या संघटनेमध्ये सर्वांनी एकजुटीने सहभागी होऊन सुरक्षित व्हावे असे आवाहन केले. तब्बल 07 महिने एवढी मोठी लढाई लढताना प्रोटान शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाने एक कप चहाची सुद्धा अपेक्षा केली नाही. असे मत पीडित शिक्षिका सपना निरगुडवार यांनी व्यक्त केले आणि अशा निस्वार्थ संघटनेमध्ये सर्व शिक्षकांनी आपला वेळ, बुद्धी, पैसा आणि श्रम खर्च करावे असे आवाहन त्यांनी सर्व शिक्षकांना केले व प्रोटान शिक्षक संघटनेचे उपकार आम्ही जीवनभर विसरणार नाही अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना मांडल्या. विभागीय अध्यक्ष गजानन ऊल्हे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना शिक्षकावर होणारे कोणतेही अन्याय यापुढे खपवून घेतल्या जाणार नाही असे सांगून आज पर्यंत शेकडो शिक्षकांना प्रोटान शिक्षक संघटनेच्या वतीने त्यांच्या नोकऱ्या परत दिल्या असून मानसिक दबावातून सुद्धा बाहेर काढले असल्याचे त्यांनी सांगितले. व संघटनेत शक्ती असून शिक्षकांनी संघटित राहिले पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला प्रोटान शिक्षक संघटनेचे विभागीय सचिव विनोद थुंल, राजेश खांदवे, जिल्हाध्यक्ष किशोर राठोड, महासचिव महेंद्र मेश्राम, उपाध्यक्ष समाधान साबळे, कार्याध्यक्ष दत्ता मेकवाड, सचिव रवी हुलगुंडे, संघटन सचिव पराग पाटील, तालुका अध्यक्ष विनोद राठोड, विश्वंभर सोळंके, अविनाश गायकवाड, नीरज कचवे, अमोल भटकर ,नितेश आगरकर इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.