
पोंभुर्णा ता. प्रतिनिधी :- आशिष एफ. नैताम
जिकडे तिकडे सद्यास्तिथीत पत्ता सीजन जोमात चालू असल्याने पोंभुर्णा येथील मजुर घेऊन रोज ये जा करीत असताना आज दि. २५ जुन रोजी सकाळी १० :३० दरम्यान पोंभुर्णा कडून भरधाव येणाऱ्या पिकअप ची टाटाएस ला जबरदस्त धडक दिल्याने गाडीतील मजुर थोडक्यात बचावले, सर्व मजुरांना ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे तात्काळ उपचारासाठी नेण्यात आले.पिकअप गाडी क्र. एम एच – ३४ बि. जी. ७८८० गाडी चालक जागेवरूनच पसार झाला, प्राथमिक उपचार घेताना काही मजुरांना ग्रामीण रुग्णालय चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले…जख्मीमद्ये, टाटा एस गाडी क्र. एम एच- ३४ बि. जी.४६४९ चालक मालक, योगेश देवाराव गुडलावार,
पंचफुला गुरुदेव गुरनुले, वैशाली येदुनाथ मानकर शांताबाई बाबुराव सोनुले,बेबी डोमा उराडे, निरज चंद्रशेखर बसारकर, उषा समाधान मानकर, कविता प्रकाश मानकर, प्रकाश मोतिराम मानकर, पुष्पा लेखराज मानकर, समादान रामदास मानकर, गीता दिलीप उराडे, सर्व राहणार पोंभुर्णा, या घटनेचा पुढील तपास उमरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार हिवरे साहेब यांचे मार्गदर्शना खाली, गणपत आत्राम, दीपक कुंभरे, सुरेश मांडरे, करीत आहे.
