सोनामाता हायस्कूल येथे गरजू विद्यार्थ्यांना गणवेष वाटप.

सहसंपादक : रामभाऊ भोयर

सोनामाता हायस्कूल चहांद तालुका राळेगाव येथे गरजू विद्यार्थ्यांना शाळेच्या गणवेश चे वाटप करण्यात आले. सोनामाता हायस्कूल येथे वर्ग पाच ते दहा चे विद्यार्थी शिक्षण घेत असून चहांद, परसोडा, येवती, मुदापूर, लाडकी, करंजी, या विविध गावातून विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात. तसेच विविध सामाजिक स्तरातून हे विद्यार्थी येत असल्यामुळे, काही गरजवंत विद्यार्थ्यांना तसेच नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने गणवेशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक माननीय धोबे सर चिव्हाने सर, कांबळे सर, शिवणकर सर, दांडेकर सर, सावंत सर, गोवारदिपे मॅडम, गावंडे मॅडम, प्रथमेश राऊत व देवानंद सोनवणे हे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना गणवेशाचे महत्त्व पटवून देण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.