गावं पातळीवर शासनाप्रती असंतोष, लोकप्रतिनिधी गप्प का?

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव हा शेतीउत्पनावर उपजीविका असणाऱ्या शेतकरी, कष्टकरी जनतेचा तालुका आहे. इथली सम्पूर्ण अर्थव्यवस्था कृषी वर आधारित आहे. गेल्या काही वर्षात सातत्याने शेतकरी नापिकी, अतिवृष्टी चा सामना करतो आहे. शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारात गेली. शासनाने मात्र कोनतीही आर्थिक मदत दिली नाही. तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन कापसाला योग्य दर मिळावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नाना सिडाम यांनी केली आहे.
यंदाच्या हंगामात सोयाबीन पिकाचे अत्यल्प उत्पन्न हाती आले. उत्पादन खर्च देखील निघाला नाही. वडकी पट्यात काही शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक संवगनी न करता उभ्या पिकात नांगर फिरवला, एकरी दोन ते तीन क्विंटल उत्पन्न हाती आले. त्यात बाजारभाव देखील मिळाला नाही. कापसाची अवस्था देखील तशीच आहे. कापसाला किमान नऊ ते दहा हजार रु. क्विंटल बाजारभाव मिळण्याची गरज आहे. मात्र या बाबत कुणीही आवाज उठवत नाही. कृषी विभागाने पांढरीमाशी व लाल्या आल्याचा अहवाल शासनाला दिल्याची माहिती अशा वेळी शेतकरी संकटात असताना त्याला मदतीची गरज असल्याची भावना नाना सिडाम यांनी व्यक्त केली.
पुढील काळात शेतकऱ्यांच्या प्रश्न|वर अधिक लक्ष देण्याच्या गरजेवर त्यांनी भाष्य केले. शेतकऱ्यांनी संघटित होण्याची गरज असून, शेतकरी आत्महत्याच्या प्रश्न|वर शासनाचे दुर्लक्ष चीड आणणारे आहे. यावर तालुक्यातील शेतकऱ्यांना एकत्रित करून मोठे आंदोलन करण्याच्या गरजेवर त्यांनी जोर दिला.लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याने गावं पातळीवर प्रचंड असंतोष असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.