अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.

(ढाणकी) प्रतिनिधी:प्रवीण जोशी


सामाजिक एकोपा जर समाजात निर्माण झाला तरच समाजाची प्रगती करता येते नुसते वाद आणि विवाद करून सामाजिक प्रश्न सोडल्या जात नाहीत. असे प्रतिपादन संजय पडोळे विदर्भ प्रादेशिक सचिव तांत्रिक कामगार युनियन यांनी 28 ऑगस्ट रोजी गांजेगाव येथे संपन्न झालेल्या साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त उपस्थितांना सांगितले. मातंग समाजासाठी राजशासन व केंद्रशासनाकडून अण्णाभाऊ साठे यांच्या नावे विविध योजना राबविण्यात येतात त्यासाठी तरुणांनी पुढाकार घेऊन या योजनेचा लाभ घेण्याची विनंती पडोळे यांनी केली.
28 ऑगस्ट रोजी गांजगाव येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गांजगाव येथील समाज मंदिराच्या पुढे ध्वजारोहण करण्यात आला. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लहुजी सावळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रबोधन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संजय पडोळे होते तर प्रमुख उपस्थितीत संजय भोसले होते. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारे भाषण यावेळी विद्यार्थ्यांनी केले दुर्गेश पोलासकर ,तेजस्विनी गाडेकर, अनुराधा कावडे, सीमा तपासकर,
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळीराम गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभुदास गायकवाड यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आकाश वाघमारे प्रल्हाद मनपुरे योगेश गायकवाड विजय वाघमारे रामेश्वर गायकवाड विकास भालेराव राजीव पुरस्कार अजय पोलासकर संजय पोलासकर मनोहर पोलासकर. यावेळी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.