
प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
यवतमाळ.
दिनांक २९ जुलै २०२३ ला शनिवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयामध्ये ढाणकी खंड १ चे तलाठी प्रदीप कुमार शिवणकर यांची प्रशासकीय बदली आणि बढती झाल्याच्या निमित्ताने त्यांचा सत्काराचा व निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
प्रदीप कुमार शिवणकर हे गेल्या अनेक दिवसांपासून ढाणकी खंड १ चे तलाठी म्हणून कार्यरत होते त्यांची बदली उमरखेड येथील कुपटी या महसूल मंडळात मंडळाधिकारी म्हणून झाली ढाणकी येथे असताना त्यांची कारकीर्द ही वाखण्याजोगी होती विशेष म्हणजे आजकाल आपण काही ठिकाणी बघतोच आहे की शेतकऱ्याचे काम तलाठी साहेबांसोबत पडल्यानंतर शेतकरी साहेब तुम्ही कधी येणार आहात असे विचारल्यानंतर साहेब आपल्या सोयीनुसार व ठरलेल्या दिवशी येतो असे उत्तर मिळते पण तलाठी शिवनकर आठवड्यातील पूर्ण दिवस व शेतकऱ्याच्या ज्यावेळी अडचणी असत त्यावेळी कार्यालयात हजर राहून आलेल्या व्यक्तीची अडचण सोडवण्याचा प्रयत्न करत असत त्यामुळे शिवणकर यांची बदली झाल्यामुळे अडचणी आणि समस्या आल्या तर सुटण्याचे एकमेव ठिकाण कमी झाले अशा स्वरूपातील प्रतिक्रिया यावेळी उपस्थित मान्यवरांनी व शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या तसेच ढाणकी खंड १ ते तलाठी कार्यालय हे नगरपंचायतच्या कॉम्प्लेक्स मध्ये वरच्या माळ्यावर असताना वयोवृद्ध व्यक्ती आणि दिव्यांग असलेल्या व्यक्तीला वर चढताना अडथळा येत असत त्यावेळी प्रदीप कुमार शिवणकर हे स्वतः खाली येऊन त्या अर्जदाराची म्हणणे शांतपणे ऐकून आलेल्या अर्जदाराला शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन योजनेला कशा प्रकारचे आणि कोण कोणते दस्तऐवज लागतात याची माहिती देऊन अर्जदाराच्या समस्याचे निराकरण करत हे विशेष. तसेच काही दिवसापूर्वी गेल्या अनेक दिवसापासून चा शेत वहिवाटीचा अत्यंत गहन व किचकट प्रश्न होता पण दोन्ही बाजूकडील शेतकऱ्यांना शेताला वहिवाट झाल्यास शेतकऱ्यांना विविध पिके घेऊन ऊस व फळ पिके घेऊन शेतकऱ्याची आर्थिक उन्नती होऊ शकते असे दोन्ही बाजूंनकडील शेतकऱ्यांना समजावून सांगून त्या समस्येतून मध्यबिंदू काढला व रस्ता खुला करून दिला या सत्कार आणि निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला बाळू पाटील चंद्रे, रुपेश भंडारी, प्रवीण जैन, अमोल तुपेकर, जहीर भाई, बंटी वाळके, साहेबराव वाघमोडे, सुनील अक्कावार, पंजाब कदम, सुधाकर बाभुळकर, अभिलाष गायकवाड, इबादुल्ला, शेख बशीर इत्यादी मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास घुगरे यांनी केले.
