आणि भाऊं नी राळेगांव तालुका भाजपा मुक्त करुन दाखविला

सहसंपादक : रामभाऊ भोयर

यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत, मतमोजणी अंती राळेगांव तालुक्यातून महाविकास‌आघाडी चे उमेदवार संजय देशमुख यांना तब्बल चौदा हजार आठशे मतांची आघाडी घेतली यांचं संपूर्ण श्रेय काॅग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड प्रफुल्ल मानकर यांच्या कुशल नेतृत्वाला असून, अवघ्या तीन वर्षात “भाऊंनी” राळेगांव तालुका भाजपा मुक्त करुन दाखविला आहे.
उमेदवार जरी उध्दवसेनेचा असला तरी, उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची जंगी जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी व नंतर चं शिस्तबद्ध नियोजनामुळे, ७७ राळेगांव विधानसभा मतदारसंघात पंचवीस हजार मतांची लक्षणिय आघाडी घेतली आहे.
उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख विनोद काकडे यांच्या मोजक्या पण प्रामाणिक शिवसैनिकांनी प्रचारात झोकून, सर्वांना सोबत घेऊन मताधिक्य वाढवलं आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगांव चे पाचव्यांदा सलग सभापती पद सांभाळत असताना कार्यकर्त्यांची विश्वासू फळी तयार केल्याने, नगर पंचायत राळेगांव, संपूर्ण सहकार क्षेत्र, ग्राम पंचायती वर काॅग्रेस पक्षाला कमालीचं बहूमतात आणून दाखवल्या नंतर, लोकसभा निवडणूकीत “न भूतो न भविष्यती” असं चौदा हजार आठशे मतांची मोठी लीड मिळवून दिलंय.
या निवडणूकी चं वैशिष्ट्य म्हणजे
“कुणबी” फॅक्टर मविआ च्या उमेदवाराच्या विरोधात असल्याचे निदर्शनास विरोधकांनी भासविण्याचा केविलवाणा प्रयत्न सातत्याने केला, हा‌ पण कुटील डाव भाऊंनी हाणून पाडला आहे. सुरुवातीला तयार झालेली “सकारात्मक हवा” शेवटपर्यंत कायम ठेवण्यासाठी भाऊंची प्रत्येक खेळी यशस्वी राहीली आहे हे विशेष..
बाॅक्स मध्ये…
बहिण की जावाई या वर ही खूप मंथन केल्या गेलंय. कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगांव चे संचालक, वाटखेड
निवासी दिपक देशमुख यांच्या आक्कडसासूंच्या कन्या या नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांच्या अर्धांगिनी, म्हणजे चं खासदार साहेब जावाई.
पंचायत समिती राळेगांव चे माजी सभापती, रिधोरा निवासी प्रविण कोकाटे यांची सख्खी मावसबहिण महायुतीच्या उमेदवार सौ राजश्रीताई हेमंत पाटील या निवडणूक रिंगणात होत्या.
भावाने बहिणी च्या प्रचारात झोकून दिले, सासरे देखील प्रचारात अग्रभागी होते, सरतेशेवटी “जावयांनी” बाजी मारत खासदार पदी विराजमान झाले आहे हे विशेष…