
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथील एक ग्रामीण समाज प्रबोधनकार अवधूत तागडे हा गेल्या 1993 पासून आपल्या कलेच्या माध्यमातून, आपल्या गायनाच्या ताकदीने समाजातील कुटुंब कल्याण, दारूबंदी,हुंडाबदी, हुंडाबळी, ग्राम स्वच्छता अभियान, तंटामुक्ती,अशा अनेक बाबीवर आपल्या गायनाच्या माध्यमातून समाज बांधवांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करीत असून आजही ते आपल्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असून त्यांच्या वाढत्या वयाचा विचार करून, त्यांच्या वृध्दावस्थेचा विचार करून आज त्यांच्या कडे जगण्यासाठी कुठलाही आधार नसून या प्रबोधनाची शासनस्तरावर आजपर्यंत कुठल्याही अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी मानधन मिळण्यासाठी मदत केली नसल्याने त्यांना पुढे आपण आपला परिवार कसा चालवायचा असा प्रश्न त्यांना भेडसावत असून त्यांची कला,त्यांची समाजसेवेची धडपड,समाजाप्रती असणारे प्रेम आजही त्यांना शांत बसू देत नसल्यामुळे शासनाने त्यांना महीनेवारी मिळणारे मानधन देण्यासाठी प्रयत्न करून त्यांना अविरत सेवा करण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी त्यांच्या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
