”महाविद्यालय आपल्या गावी” या उपक्रम अंतर्गत कोसरसार येथे आनंद निकेतन महाविद्यालया मार्फत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा


आनंद निकेतन महाविद्यालय आनंद, वरोरा द्वारा…नुकताच २१ जून २०२४ ला १० वा आंतरराष्ट्रीय योग दिवस संपूर्ण जगभरात साजरा करण्यात आला…त्यामाध्यमातून योग स्वतःसाठी व समाजा करिता असा उद्देश पुढे ठेवून आनंद निकेतन महाविद्यालया मार्फत महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण क्रिडा विभाग प्रमुख प्रा.श्री.तानाजी बायस्कर सर आणि प्रा.श्री.दिपकजी शिव सर यांच्या मार्फत गावो-गावी जाऊन एक मोहिम राबविण्यात आली व लोकांना जागरूक करुन आपल्या शारीरिक व मानसिक जीवनामध्ये योगांचे महत्व काय हे समजून सांगण्यात आले व त्या बद्दल एक तरुण पिढीला संदेश देण्यात आला… निरोगी शरीर तसेच स्वस्थ मना साठी योग अतिशय आवश्यक आहे. दररोज योग केल्याने शरीराला ऊर्जा तसेच मनाला शांती मिळते. सन २०१५ पासून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. व भारतीय संस्कृती मध्ये योगाला खूप महत्त्व आहे. आजच्या धावपळीच्या काळात आपण योगाच्या माध्यमातून आपले शरीर व मन निरोगी ठेवू शकतो या सर्व गोष्टी समोर ठेवून…
गावातील नागरिकांकरिता योगाभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले… त्यामध्ये कोसरसार या गावामध्ये सुध्दा दि.०१/०७/२०२४ ला सोमवार ला सकाळी ठिक १०:३० वाजता हा कार्यक्रम कर्मविर विद्यालय कोसरसार शाळेच्या भव्य पटांगणावर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला…या कार्यक्रमामध्ये गावातील दोन्ही शाळा एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला…जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे संपूर्ण विद्यार्थी व शाळेचे मुख्याध्यापक श्री.ढोबळे सर,माहूरे मॅडम,मोडघरे मॅडम उपस्थित होत्या…तथा कर्मविर विद्यालय कोसरसार शाळेचे संपूर्ण विद्यार्थी व शाळेचे मुख्याध्यापक श्री.डांगाले सर, सागोळले सर,नगराळे सर,तलमवार मॅडम,साळवे सर,लडके सर,निल सर,‌वाकडे‌ सर, आत्राम बाबू साहेब उपस्थित होते… तसेच गावातील सरपंच श्री.गणेशभाऊ मडावी,उपसरपंच श्री.अमितभाऊ बहादूरे, ग्रा.प सदस्या सौ कारवटकर ताई, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.नितीनभाऊ मायकरकार, गणेश उराडे,मयुर बुरांडे,संदिप निबरड,अनुप वरभे, सुयोग भटकर, वैभव कारवटर,करण निमरड तथा गावातील असंख्य तरुण मंडळी व सर्व गावकरी मंडळी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते…‌