मंडल अधिकाऱ्यास ३ हजाराची लाच घेतांना पकडले

महसुल विभागातील गाव पातळीवर काम करणारा कर्मचारी पटवारी व ४-५ गाव मिळून बनलेल्या मंडळ अधिकारी यांच्याकडे गावातील जमीनीचा लेखाजोखा अर्थात मालकी हक्काची नोंद असते व हे दोन्ही कर्मचारी वडीलांची शेती मुलाच्या नावाने किंवा कोणाचीही शेती दुसऱ्याच्या नावाने फेरफार करून देण्याकरता पैशाची मागणी करतात. आणि पटवारी व मंडळ अधिकारी यात मोठ्या प्रमाणात लाच घेताना पकडले जातात. राळेगाव तहसील च्या मंडळ अधिकारी आरोपी शिशिर एकनाथ निनावे यांनी पडताळणी कारवाई दरम्यान पंचा समक्ष तक्रारदारी यांना त्यांच्या बहिणीच्या नावे शेतीचा फेरफार करून देण्यासाठी तडजोडी 3 हजार रुपये लाचेची मागणी केली. आठ ऑगस्ट रोजी राळेगाव येथील एम एस सी बी कार्यालयासमोर त्याला तक्रारदाराकडून 3000 रुपये लाज घेताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई यवतमाळ लाज लुचपत विभागाचे पोलीस उपनिरीक्षक उत्तम व्ही नामवाडे अमलदार निलेश पखाले, जयंत ब्राह्मणकर, अतुल मत्ते, सचिन भोयर,राहुल गेडाम, राकेश सावसाकडे, सुरज मेश्राम पो उप नि संजय कांबळे यांनी केली. त्यांचे विरुद्ध राळेगाव पोलीस स्टेशनला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याद्वारे गुन्हा दाखल करून सदर अधिकाऱ्यांस रात्री हवालात बंद करण्यात आले.